हिवाळ्यात दुधात मिसळून खा ही एक गोष्ट, शरीर होईल मजबूत
हिवाळा सुरु झाला की अनेक आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. आपली रोगप्रतिकार शक्ती कमजोर असेल तर वेगवेगळे आजार उद्भवतात. त्यामुळे हिवाळ्यात तुम्ही डाएटची योग्य काळजी घेतली तर तुम्हाला तुमचे आरोग्य नीट जपता येईल.
मुंबई : तुम्हाला जर खूप अशक्त वाटत असेल किंवा लवकर थकवा येत असेल तर तुम्हाला आहारात पोषक घटकांचा समावेश करण्याची गरज आहे. शारीरिक दुर्बलतेपासून मुक्त होण्यासाठी तुम्ही तुमच्या डाएटमध्ये काही गोष्टी अॅड करु शकता. दुधात अंजीर मिसळून घेतल्यास त्याचे मोठे फायदे होतात. यातून पोषक तत्व शरीराला मिळतात. वयाच्या ४० व्या वर्षीही चेहऱ्यावरील चमक टिकून राहते.
हिवाळ्यात अंजीर दुधात मिसळून पिण्याचे फायदे
– हिवाळ्यात अंजीर दुधात मिसळून प्यायल्यास शरीर उबदार राहते. यामुळे थंडीत होणाऱ्या आजारांपासून तुमचा बचाव होतो. अंजीरमध्ये कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, सेल्युलोज, मिनरल्स आणि अॅसिड्स चांगल्या प्रमाणात असतात. लोह, व्हिटॅमिन ए, कॅल्शियम, पोटॅशियम, सोडियम, सल्फर, फॉस्फोरिक अॅसिड यांसारखे पोषक घटकही अंजीरमध्ये आढळतात.
– अंजीर रोगप्रतिकारशक्ती मजबूत करतात. यामुळे अशक्तपणा जाणवत नाही. अंजीर आणि दूध एकत्र करुन प्यायल्याने शरीरातील हाडांची रचना मांसाने भरून जाते.
– अंजीरमध्ये फायबर मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे पोटात गॅस आणि बद्धकोष्ठता सारखी समस्या होत नाही. पचनक्रिया मजबूत होते. सकाळी पोट सहज साफ होते.
– अॅनिमियाने त्रस्त असलेल्या व्यक्तीने आपल्या आहारात अंजीरचा समावेश करावा कारण त्यात पुरेशा प्रमाणात लोह आणि कॅल्शियम आढळते. हे हृदयाच्या आरोग्यासाठी खूप चांगले मानले जाते.
अंजीरमध्ये जस्त, मॅग्नेशियम, लोह यांसारखे महत्त्वाचे घटक आढळतात. हे सर्व घटक प्रजनन क्षमता चांगली करतात. मासिक पाळीदरम्यानच्या समस्यांवर देखील ते खूप प्रभावी आहेत.
मधुमेह असल्यास अंजीराचे सेवन फायदेशीर मानले जाते. अंजीरमध्ये असलेल्या क्लोरोजेनिक ऍसिडमुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यास मदत होते. भिजवलेले अंजीर आणि त्याचे पाणी पिऊन रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवता येते.
अस्वीकरण: वरील दिलेली माहिती ही केवळ सामान्य माहिती आहे. हा कोणत्याही वैद्यकीय सल्ला नाही. कोणतीही समस्या असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.