गुलाबी गाल आणि चमकती त्वचा हवी असेल तर रोज खा टोमॅटो
कच्चे टोमॅटो खाण्याची सवय शरीराला अनेक समस्यांपासून वाचवू शकते. टोमॅटोचे सेवन केल्याने शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते आणि त्यात असलेल्या अँटिऑक्सिडंट मुळे त्वचेच्या अनेक समस्या दूर होतात.
त्वचेची काळजी घेण्यासाठी आपण बाजारात मिळणारे महागडे प्रॉडक्ट विकत घेतो. पण त्याचा जास्त फायदा होत नाही. नेहमी सुंदर आणि तरुण दिसायचे असेल तर रोज दोन कच्चे टोमॅटो खाण्याची सवय लावा खरे तर रोज लाल पिकलेले कच्चे टोमॅटो खाण्याची सवय शरीराला अनेक समस्यांपासून वाचवू शकते. टोमॅटोचे सेवन केल्याने शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते आणि त्यात असलेल्या अँटिऑक्सिडंट मुळे त्वचेच्या अनेक समस्या दूर होतात.
त्वचा मॉइश्चराईज करते
विविध प्रकारच्या क्रीम लोशन कोरडेपणावर उपचार करू शकतात परंतु ह्या समस्या टाळू शकत नाहीत. कोरडी त्वचा, खाज सुटणे फ्लेक होणे यावर देखील टोमॅटो गुणकारी आहे. टोमॅटोमध्ये असलेले पोटॅशियम एटोपिक त्वचारोग कमी करण्यास मदत करू शकते याशिवाय चेहऱ्याचे हायड्रेशन वाढते आणि त्वचेला आतून मॉइश्चरायझर होण्यास मदत करते.
गाल गुलाबी होतील
टोमॅटोमध्ये पोटॅशियम, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी आणि विटामिन सी असते टोमॅटोच्या सेवन केल्याने शरीरातील रक्त वाढते आणि त्वचेचा पोत सुधारतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामधील आयर्न शरीरातील रक्त वाढवण्यास मदत करते. ज्यामुळे तुमच्या गालावर गुलाबी छटा दिसायला लागतात.
सनबर्न
टोमॅटो सनबर्न कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. हेत्वचेला एक्सपोलेट करते आणि त्वचेच्या मृत पेशी काढून टाकते हे त्वचेचे आरोग्य सुधारण्यास देखील मदत करते. टोमॅटो मध्ये असलेले एंजाइम्स त्वचेचे छिद्र साफ करण्यास मदत करतात आणि चेहऱ्यावरील ऑक्सिजनची पातळी वाढवतात तसेच सनबर्न कमी करण्यास मदत करतात.
सुरकुत्या कमी करण्यासाठी उपयुक्त
कच्च्या टोमॅटोचे कॉलेजन उत्पादन उत्तेजित करण्यासाठी खूप फायदेशीर आहे टोमॅटोमधील विटामिन सी कोलेजनचे उत्पादन उत्तेजित करण्यास मदत करते. त्यामुळे त्वचेची लवचिकता सुधारते आणि त्यामुळे त्वचेचा पोत सुधारतो.