डाळिंब आणि बदामसोबत खा आणि वजन कमी करा, वाचा याबद्दल अधिक !
जर आपले वजन वाढत असेल तर ताबडतोब आपल्या आहारावर नियंत्रण ठेवण्यास सुरुवात करा. एकदा जर वजन वेगाने वाढले तर पुन्हा वजन कमी करण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात.
मुंबई : जर आपले वजन वाढत असेल तर ताबडतोब आपल्या आहारावर नियंत्रण ठेवण्यास सुरुवात करा. एकदा जर वजन वेगाने वाढले तर पुन्हा वजन कमी करण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. वजन कमी करणे आणि वाढणे हे सर्व आपल्या आहारावर ठरलेले असते. वजन कमी करण्यासाठी आपण काय आहार घेतो हे सर्वात महत्वाचे आहे. वजन कमी करण्यासाठी आहारात डाळिंब आणि बदामसोबत खाल्ल्ये पाहिजे. यामुळे आपले वजन कमी होण्यास मदत होते. (Eat with pomegranate and almonds and lose weight)
डाळिंबमध्ये व्हिटामिन ए, सी आणि ई भरपूर प्रमाणात आढळतात. यात अँटी-ऑक्सिडंट, अँटी-व्हायरल आणि अँटी-ट्यूमर गुणधर्म देखील आहेत, जे आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. बदामामध्ये कॅलरीचे प्रमाण कमी आहे, म्हणून मूठभर बदाम सेवन केल्यास वजन वाढण्याचा धोकाही वाढत नाही. या व्यतिरिक्त, बदाम आपल्या शरीराची चयापचय टिकवून ठेवतात, जे आपल्या शरीराचे वजन कमी करण्यास आणि नियंत्रित करण्यासाठी खूप महत्वाचे आहेत. यामुळे आपण डाळिंब आणि बदाम एकत्र खाणीत.
यामुळे आपल्याला बराच काळ भूक लागत नाही आणि आपले वजन कमी होण्यास मदत होते. दररोज आपल्या नाश्त्यामध्ये बदामांचा समावेश करून आपण टाईप 2 मधुमेहाचा धोका टाळू शकता. बदामांमध्ये उच्च फायबर, असंतृप्त चरबी आणि कमी कार्बोहायड्रेट्स असतात. यासह, बदाम कमी ग्लायसेमिक निर्देशांक श्रेणीमध्ये समाविष्ट आहेत, ज्याचा अर्थ असा आहे की त्यामध्ये ग्लूकोजचे प्रमाण बरेच कमी आहे. हेच कारण आहे की, ते रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास खूप उपयुक्त आहे.
डाळिंबामुळे लठ्ठपणा नियंत्रित होतो, हे बर्याच अभ्यासांमध्ये सिद्ध झाले आहे. कारण डाळिंबात फायबर आणि कमी कॅलरीजयुक्त घटक असतात. हे खाल्ल्यानंतर आपल्याला भूक लागत नाही. जर आपण वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल, तर आपल्या आहारात डाळिंबाचा समावेश नक्कीच करा. डाळिंब तुमच्या रक्तातील ऑक्सिजनची पातळी सुधारण्यास मदत करतो. डाळिंबामध्ये अँटी-ऑक्सिडेंट उपस्थित असल्यामुळे ते फ्री रॅडिकल्सशी लढते. यासह, हे आपल्या शरीरात कोलेस्टेरॉलचे प्रमाण देखील कमी करते. डाळिंबामुळे रक्ताच्या गाठी तयार होण्यास प्रतिबंध होतो.
(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
संबंधित बातम्या :
सावधान! अपुरी झोप स्त्रियांसाठी घातक, कर्करोगासह ‘या’ गंभीर समस्यांना ठरेल कारणीभूत…
Weather change sickness । बदलत्या हवामानात चुकूनही करु नका या 5 चुका, आजारी पडाल
Beauty Tips | चेहऱ्याचे सौंदर्य वाढवतील ‘ही’ योगासने, तुम्हीदेखील नक्की ट्राय करा!#beautytips | #skincare | #yoga | #beauty https://t.co/zqbiogPSVT
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 25, 2021
(Eat with pomegranate and almonds and lose weight)