आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी ‘बीट’, वाचा याचे फायदे…
बीट खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. बीट हे लोह, जीवनसत्व, फॉलिक अॅसिड आणि खनिजांचा चांगला स्त्रोत आहे.
मुंबई : बीट खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. बीट हे लोह, जीवनसत्व, फॉलिक अॅसिड आणि खनिजांचा चांगला स्त्रोत आहे. बीट शरीरातील हिमोग्लोबिन वाढवतात आणि रक्त शुद्ध करतात. त्यात आढळणारे अँटिऑक्सिडेंटस शरीराला रोगांशी प्रतिकार करण्याची क्षमता देतात. याबरोबरच नायट्रेट, बेटेन, मॅग्नेशियम, फॉस्फरस, सोडियम, व्हिटामिन बी 1, बी 2 आणि सी हे तत्व बीटाचे औषधी गुणधर्म वाढवतात. चला तर मग जाणून घेऊयात बीट खाण्याचे फायदे…(Eating beets is extremely beneficial for health)
बीटमध्ये पाण्याचे प्रमाण 87% आहे. त्याचवेळी कार्ब 8 टक्के आणि फायबर 2 ते 3 टक्के आहे. उकडलेले बीटच्या 136 ग्रॅममध्ये 60 पेक्षा कमी कॅलरी असतात. 100 ग्रॅम बीटमध्ये पोषण किती आहे हे पाहूयात…
कॅलरी: 43
पाणी: 88%
प्रथिने: 1.6 ग्रॅम
कार्ब: 9.6 ग्रॅम
साखर: 6.8 ग्रॅम
फायबर: 2.8 ग्रॅम
चरबी: 0.2 ग्रॅम
बीट खाण्याचे फायदे
-यामध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम असते, जे शरीरातील पोटॅशियमची कमतरता दूर करते. पोटॅशियम अभावी शरीरात थकवा आणि अशक्तपणा यासारख्या समस्या उद्भवतात.
-शरीरात कोलेस्टेरॉलची पातळी वाढत असेल तर आपण बीटच्या रसाचे सेवन करू शकता. यासाठी ते खूप फायदेशीर आहेत.
-बीटमध्ये मिनरल सिलिका असते. या तत्त्वामुळे शरीर कॅल्शियमला प्रभावी रुपात वापरता येऊ शकते. कॅल्शियम आपल्या दात आणि हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक असते.
-बदतल्या वातावरणामुळे आणि खाण्यापिण्याच्या सवयींमुळे गॅसचा त्रास उद्भवतो. दोन चमचे बीटचा रस आणि मध एकत्र खाल्याने गॅसची समस्या दूर होते.
-बीट नायट्रेट्सचा एक चांगला स्रोत आहे. याचे सेवन केल्यावर हे नायट्राट्स आणि एक गॅस नायट्रिक ऑक्साइड्समध्ये बदलते.
-वाढत्या दगदगीमुळे पौष्टिक खाण्याकडे लक्ष नसते. त्यामुळे अनेक त्रास उद्भवू शकतात. रोज सकाळी 1 कप बीटचा रस प्यायल्याने त्याचा खूप मोठा फायदा होता.
-बीट खाल्ल्याने आपल्या शरीरातील थकवा दुर होण्यास मदत होते.
-बीट खाल्ल्याने शरीरातील रक्ताची पातळी वाढते.
-शरीराला ऑक्सीजन योग्य प्रमात मिळते आणि एनर्जी बीट खाल्ल्याने वाढते.
-अशक्तपणा लोकांनी दररोज बीट खाणे आरोग्यासाठी चांगले आहे.
संबंधित बातम्या :
Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो
Papaya Seeds Benefit | तुम्ही पपईच्या बिया फेकून देताय…? तर थांबा अगोदर हे वाचा!
Turmeric | बहुगुणकारी ‘कच्ची हळद’, शरीराला ‘या’ गंभीर आजारांपासून ठेवले दूर!https://t.co/Lxb4VlMkMk#HealthBenefits #RawTurmeric
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 22, 2020
(Eating beets is extremely beneficial for health)