Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bottle Gourd Benefits : उन्हाळ्यात दुधी भोपळा खाण्याचे 6 फायदे जाणून घ्या !

हिरव्या भाज्या खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. त्यामध्येही दुधी भोपळा हा शरीरासाठी खाणे चांगला असतो.

Bottle Gourd Benefits : उन्हाळ्यात दुधी भोपळा खाण्याचे 6 फायदे जाणून घ्या !
Follow us
| Updated on: Apr 14, 2021 | 9:18 AM

मुंबई : हिरव्या भाज्या खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. त्यामध्येही दुधी भोपळा हा शरीरासाठी खाणे चांगला असतो. दुधी भोपळ्याला आयुर्वेदिक औषधी गुणांमुळे विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. यात लोह, कॅल्शियम, फॉस्फरस व अन्य खनिजे तसेच क जीवनसत्व आहे. अन्नाव्यतिरिक्त दुधी भोपळ्याचा वापर इतरत्रही होतो. गोल, लांब आणि लहान आकारामध्ये दुधी भोपळा बाजारात मिळतो. उन्हाळ्यात विशेष करून दुधी भोपळा खाल्ल्याने आपले शरीर थंड राहते. (Eating Bottle Gourd in summer is beneficial for health)

-हृदयाला निरोगी ठेवण्यासाठी दुधी भोपळा खूप फायदेशीर आहे. आठवड्यातून तीन वेळा दुधी भोपळ्याचा रस पिल्याने तुमचे हृदय निरोगी राहते. यासह, आपले रक्तदाब देखील नियंत्रित राहते.

-दुधी भोपळ्याचा रस तुमचे वजन कमी करण्यासही मदत करते. लोह, जीवनसत्त्वे आणि पोटॅशियम समृद्ध आहे. रोज दुधी भोपळ्याचा रस घेतल्याने वजन कमी होते.

-आजकाल वाढत्या प्रदूषणामुळे लोकांचे केस अकाली पांढरे झाले आहेत. या प्रकरणात, आपण दररोज एक ग्लास दुधी भोपळ्याचा रस घेऊ शकता. हे आपल्या केसांचा रंग आणि पोत अखंड ठेवेल.

-स्थूल व्यक्तींनी वजन कमी करण्यासाठी रोज संध्याकाळी जेवणापूर्वी दुधीचे सूप प्यावे. या सूपाला संधव, जिरे, हळद, मीठ व गाईच्या तुपाची फोडणी द्यावी. यामुळे पोट भरल्याची भावना निर्माण होते व शरीरास सर्व पोषक घटकही मिळतात.

-दुधी भोपळ्याचे अनेक फायदे आहेत. मूळव्याधाच्या आजारावरदेखील दुधी उपयोगी पडतो. त्यासाठी दुधी भोपळ्याचे साल सुकवून त्याचा बारीक भुगा बनवून घ्या. आणि रोज सकाळी-सायंकाळी एक चमचा थंड पाण्यासोबत याचं सेवन करा. त्यामुळेदेखील तुम्हाला आराम मिळेल.

-दुधी भोपळा पोटाच्या विकारांकरताही खूप फायदेशीर ठरतो. दुधी भोपळ्याला मंद आचेवर भाजून त्याचा भरीत बनवा. त्यातील रस पिळून काढून त्यामध्ये थोडी साखर घालून प्यायल्यामुळे लिव्हर आणि पोटाच्या विकारांवर फायदा होता.

संबंधित बातम्या : 

एकदा उकळवलेले दूध पुन्हा उकळवण्याची चूक करताय? होऊ शकते मोठे नुकसान!

Beauty Tips : कोपर आणि मान काळवंडलेयत? मग ‘या’ घरगुती टिप्स नक्की ट्राय करा!

(Eating Bottle Gourd in summer is beneficial for health)

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.