अनेक रोगांवर गुणकारी लवंग, वाचा याबद्दल अधिक !

लवंगाचे आरोग्याच्या दृष्टीनेही बरेच फायदे आहेत, परंतु बर्‍याच लोकांना त्याबद्दल पुरेशी माहिती नाही.

अनेक रोगांवर गुणकारी लवंग, वाचा याबद्दल अधिक !
लवंग
Follow us
| Updated on: May 28, 2021 | 9:08 AM

मुंबई : लवंगाचे आरोग्याच्या दृष्टीनेही बरेच फायदे आहेत, परंतु बर्‍याच लोकांना त्याबद्दल पुरेशी माहिती नाही. आयुर्वेदातही लवंगाशी संबंधित बरेच उपाय नमूद केले गेले आहेत. लवंगमध्ये यूजेनॉल असते जे साइनस आणि दातांदुखी सारख्या हेल्थ प्रॉब्लम ठिक करण्यात मदत करते. लवंग ही गरम असते. यामुळे सर्दी-खोकला झाल्यावर लवंग खावी किंवा याची चहा बनवून पिणे फायदेशीर आहे. लवंगेचा एक काळ सर्दी, पडसे किंवा खोकल्याकरिता घरगुती औषध म्हणून मोठा वापर होता. (Eating cloves is beneficial for your healthy life)

विशेष म्हणजे सध्याच्या कोरोनाच्या काळात तर आपण लवंगचे सेवन जास्तीत-जास्त प्रमाणात केले पाहिजे. लवंग आपल्या संक्रमणापासून दूर ठेवण्यास मदत करते. लवंगाचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास देखील मदत होते. लवंगेचा फाजील वापर केल्यास डोळे, मूत्राशय व हृदयावर परिणाम वाईट होतो. तोंड येते, जिभेला जखम होते. आयुर्वेद शास्त्राप्रमाणे प्राणवह स्त्रोतसाच्या सर्व विकारात लवंग उत्तम काम करते. सर्दीने सतत नाक वाहत असेल तर एकएक करून तीन-चार लवंग लागोपाठ चघळाव्या.

सर्दी लगेच थांबते. लवंगेत तेल आहे, त्याचा विशद गुण आहे. त्यामुळे घसा, गळा, गाल, जीभ सर्व स्वच्छ राहते. लवंगेचे तेल सर्दीकरिता अत्यंत उपयुक्त आहे. रुमालावर दोन थेंब तेल टाकले की, त्याच्या हुंगण्याने नाक मोकळे होते. एका भांड्यात 2 कप पाणी घाला आणि उकळल्यानंतर त्यात 4 ते 5 लवंगा, दालचिनी आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा घाला. सुमारे 15 ते 20 मिनिटे याला उकळी येऊ द्या. त्यानंतर, हा चहा गाळा आणि वर एक चमचा मध आणि एक चमचा लिंबाचा रस मिसळून प्या.वजन कमी करण्यासाठी लवंग चहा अत्यंत फायदेशीर आहे.

आपण जर दररोज हा चहा घेतला तर आपले वजन कमी होण्यास मदत होईल. सकाळी जर आपण व्यायामाला जात असाल तर हा चहा घ्या यामुळे आपल्या शरीरावरील चरबी कमी होण्यास मदत होते. मसालेदार चहा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. परंतु, जास्त प्रमाणात त्याचे सेवन केल्याने आपले नुकसान देखील होऊ शकते. दिवसातून 1 ते 2 वेळाच लवंगयुक्त चहा प्या. जास्त चहा घेतल्यामुळे स्नायू वेदना, पोटाच्या समस्या उद्भवू शकतात. गर्भवती आणि स्तनपान देणाऱ्या महिलांनी लवंगाचे जास्त सेवन करू नये.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो

(Eating cloves is beneficial for your healthy life)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.