Fruits For Weight Loss : उन्हाळ्याच्या हंगामात ‘या’ फळांच्या सेवनाने कमी होईल वजन!

उन्हाळ्याच्या हंगामात आहारात जास्त फळं घेतली जातात. त्यात बहुधा अशी फळे असतात ज्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण होते.

Fruits For Weight Loss : उन्हाळ्याच्या हंगामात ‘या’ फळांच्या सेवनाने कमी होईल वजन!
व्हिटॅमिन सी ताणतणाव कमी करण्यास उपयुक्त ठरते. संत्री, स्ट्रॉबेरी, द्राक्षे अशी फळे खाल्ल्यास तणाव कमी होण्यास मदत होते.
Follow us
| Updated on: May 20, 2021 | 9:58 PM

मुंबई : उन्हाळ्याच्या हंगामात आहारात जास्त फळं घेतली जातात. त्यात बहुधा अशी फळे असतात, ज्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण होते. ही फळे शरीराला थंड करण्यासाठी देखील काम करतात. या फळांमध्ये अनेक पोषक घटक असतात. आरोग्याच्या अनेक समस्या दूर करण्यात ते मदत करतात. विशेष म्हणजे यामध्ये अशी काही फळे आहेत .ज्यामुळे आपले वजन कमी होण्यास देखील मदत होते. (Eating fruits is beneficial for weight loss)

कलिंगड – उन्हाळ्यात कलिंगड खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यात पुरेसे पाणी असते. तसेच यात अनेक पौष्टिक घटक असतात आणि कॅलरीजचे प्रमाणही कमी असते. हे फळ खाल्ल्याने तुमचे शरीर हायड्रेटेड राहते आणि अधिकवेळ भूकही लागत नाही.

आंबा – आंब्यामध्ये ए,बी आणि सी ही तिन्ही जीवनसत्वे असतात. याशिवायही आंब्यामध्ये शरीराला आवश्यक आणि वजन कमी करण्यास उपयुक्त असे अनेक घटक असल्याने उन्हाळ्यात हे फळ खायला पाहिजे. आंब्यामध्ये व्हिटॅमिन ए, सी सोबतच कॉपर, झिंक, पोटॅशियमसारखे अनेक मिनरल्स असतात.

खरबूज- खरबूजात भरपूर पाणी असते आणि त्यात चरबीचे प्रमाण खूप कमी असते. जर, तुम्हाला वजन कमी करायचे असेल, तर उन्हाळी आहारात खरबूज नक्की सामील करा. या फळामध्ये जीवनसत्त्वे अ, सी, बी 6, मॅग्नेशियम आणि फायबर आहेत.

अननस – अननसामध्ये कॅलरींचे प्रमाण कमी आहे. पण, त्यात भरपूर फायबर आणि व्हिटामिन सी आहे. हे आपल्या पोटावरील चरबी कमी करण्यास मदत करते. या व्यतिरिक्त हे चयापचय वाढवण्याचे कामही करते.

लीची – लीची हे एक फळ आहे. त्याची चव गोड असते. त्याचा रंग लाल आणि पांढरा असतो. त्याच्या सुगंध आणि चवीमुळे हे बर्‍याच पदार्थांमध्ये आणि कॉकटेलमध्ये वापरले जाते. हे फळ आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. लीचीच्या झाडाचे साल, बिया, पानेही फार औषधी आहेत.

स्ट्रॉबेरी – घरात लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच स्ट्रॉबेरी खाण्यासाठी खूप आवडते. स्ट्रॉबेरी खाण्यासाठी जेवढी चवदार आहे तेवढीच आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. स्ट्रॉबेरी शरीरातील अनेक खनिजे आणि जीवनसत्त्वे यांची कमतरता पूर्ण करू शकते.

द्राक्षे – द्राक्ष्यामध्ये व्हिटामिन सी आणि फायबरची मात्रा जास्त असल्याने वजन कमी करण्यास ते अतिशय उपयुक्त आहे. आपल्या आहारात द्राक्षाचा समावेश केल्यास काहीच दिवसांत फरक पडतो.

(टीप : कोणताही उपाय करण्यापूर्वी नेहमीच एखाद्या विशेषज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

संबंधित बातम्या : 

तुम्हालाही सुंदर आणि तजेलदार त्वचा हवीय? ‘हे’ घरगुती उपाय नक्की करुन पाहा !

Milk Testing : सावधान! घट्ट दिसण्यासाठी दुधात मिसळले जातायत ‘हे’ घटक, अशी तपासा दुधाची शुद्धता

(Eating fruits is beneficial for weight loss)

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.