Grapes Health Benefits : द्राक्ष खाण्याचे फायदे काय?; वाचा 9 मोठे फायदे!

उन्हाळ्याच्या हंगामात फळे खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. फळे आपल्याला हायड्रेटेड तसेच ताजे ठेवतात.

Grapes Health Benefits : द्राक्ष खाण्याचे फायदे काय?; वाचा 9 मोठे फायदे!
द्राक्ष
Follow us
| Updated on: May 24, 2021 | 2:52 PM

मुंबई : उन्हाळ्याच्या हंगामात फळे खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. फळे आपल्याला हायड्रेटेड तसेच ताजे ठेवतात. या हंगामात अनेक लोक द्राक्ष खाण्यावर जास्त भर देतात. द्राक्षात देखील पुष्कळ पोषक घटक असतात. फायबर, प्रथिने, लोह, तांबे, फोलेट, व्हिटॅमिन सी, ए, के आणि बी इत्यादी घटक द्राक्षात असतात. यामुळे द्राक्ष खाणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. (Eating grapes is very beneficial for your health)

रोगप्रतिकारक शक्तीसाठी – द्राक्षांमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी 6 आणि लोह असते. ही पोषक घटक रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याचे काम करतात. ते संक्रमणाशी लढण्यात मदत करतात. म्हणूनच आपण द्राक्षाचा समावेश आपल्या आहारात केला पाहिजे.

थकवा दूर करण्यासाठी – द्राक्षामध्ये व्हिटॅमिन, मॅग्नेशियम, फॉस्फरस, लोह आणि तांबे असतात. हे आपल्या शरीराला ऊर्जा देण्याचे कार्य करते. यामुळे थकवा दूर होतो.

अनेक रोगांवर उपाय – द्राक्षात ग्लूकोज, मॅग्नेशियम सारखे अनेक घटक असतात. द्राक्षे अनेक रोगांवर उपयुक्त आहेत. त्याचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे. प्रामुख्याने टीबी, कर्करोग आणि रक्त संसर्ग यासारख्या आजारांमध्ये फायदेशीर आहे.

डोळ्यांसाठी फायदेशीर – द्राक्षातील पॉलीफेनोल्स आणि रेझेवॅटरॉल डोळ्यांच्या समस्येस प्रतिबंधित करते. यात मॅक्युलर डीजनरेसन, ऑक्सिडेटिव्ह ताण, जळजळ आणि मोतीबिंदू इ. समाविष्ट आहे. द्राक्षाचे सेवन आंधळेपणाची समस्या दूर करण्यास देखील मदत करते.

रक्तदाब नियंत्रणात राहतो – द्राक्ष खाल्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो. ज्यांना रक्त दाबाचा त्रास आहे, त्यांनी आठवड्यातून तीन ते चारवेळा द्राक्ष खाल्यांस त्यांना फायद्याचं ठरणार आहे.

रक्ताची कमतरता – शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी द्राक्ष फायदेशीर ठरतात. यात भरपूर प्रमाणात आयर्न असते. शरीरात रक्ताची कमतरता असल्यास एक ग्लास द्राक्षांच्या रसात २ चमचे मध घालून प्यायल्याने रक्ताची कमतरता दूर होते.

हृदयरोग – जगातील बहुतेक मृत्यू हृदयाशी संबंधित आजारांमुळे होतात. म्हणून, हृदयाशी संबंधित रोगांवर उपचार म्हणून द्राक्षे खाल्ली पाहिजेत. काही काळापूर्वी केलेल्या संशोधनात असे आढळले आहे की स्तनाच्या कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी द्राक्षे खाणे खूप फायदेशीर आहे.

मधुमेह – मधुमेह ग्रस्त असलेल्या व्यक्तींनी देखील द्राक्षे खाल्ली पाहिजेत. आपल्या शरीरातील साखरेची पातळी कमी करण्याचे काम द्राक्ष करतात.

माइग्रेनच्या समस्या – सध्या आपली सर्वांच्याच जीवनशैलीत खूप मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत. त्यामुळे माइग्रेनच्या समस्येत वाढ झालेली दिसत आहे. आपल्यालाही मायग्रेनची समस्या असल्यास, आपण त्वरित द्राक्षे खाण्यास सुरवात केली पाहिजे. द्राक्षाचा रस पिणे आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. काही दिवस तुम्ही द्राक्षाचा रस घेतल्यास तुम्हाला मायग्रेनच्या समस्येपासून मोठा दिलासा मिळू शकेल.

संबंधित बातम्या : 

Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो

(Eating grapes is very beneficial for your health)

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.