Jackfruit seed Side effect : फणसाच्या बिया खाणे आरोग्यासाठी धोकादायक, ‘या’ रुग्णांना धोका अधिक
णस खाणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. फणसात विटॉमिन ए, सी, थाइमिन, पोटॉशियम, कॅल्शियम, आयरन, फॉलिक अॅसिड, मॅग्नेशियम असते.
मुंबई : फणस खाणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. फणसात विटॉमिन ए, सी, थाइमिन, पोटॉशियम, कॅल्शियम, आयरन, फॉलिक अॅसिड, मॅग्नेशियम असते. जे आपल्या शरीरासाठी आवश्यक असते. फणस हे जगातील सर्वात मोठे फळ आहे. बरेच लोक फणसाच्या बिया उसळून आणि भाजून खातात. खाण्यासाठी या बिया अत्यंत चवदार असतात. या बिया खाल्ल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. शिवाय अशक्तपणा कमी होण्यास मदत होते. मात्र, या बिया खाणे आपल्या आरोग्यासाठी धोकादायक देखील आहेत. (Eating jackfruit seeds is dangerous to health)
रक्तदाब कमी होऊ शकतो
फणसाच्या बिया खाल्ल्याने आपला रक्तदाब कमी होतो. ज्या लोकांना बीपीचा त्रात होतो त्यांनी फणसाच्या बिया खाणे टाळावे. एवढेच नव्हे तर ज्या लोकांना हाय बीपी आहे ते रक्तदाब कमी करण्यासाठी औषध खातात. त्यांनी फणसाच्या बिया खाल्ल्या पाहिजेत. या बिया खाल्ल्याने त्यांचा रक्तदाब कमी होईल
साखरेची पातळी कमी होतो
फणसाच्या बिया खाल्ल्याने शरीरातील साखरेचे प्रमाण कमी होते. जर एखाद्या व्यक्तीला साखर किंवा हायपोग्लाइसीमिया असेल तर त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार फणसाच्या बिया आहारात घ्याव्यात. याशिवाय मधुमेहाचे रुग्ण साखर कमी करणारी औषधे घेत आहेत असतील तर त्यांनी देखील फणसाच्या बिया खाणे टाळावे.
रक्त पातळ होते
रक्त गोठल्यामुळे बरेच लोक रक्त पातळ करण्यासाठी औषधे घेतात. अशा लोकांनी चुकूनही आहारात फणसाच्या बिया घेऊ नयेत. कारण फणसाच्या बिया खाल्ल्याने रक्त गोठण्याची शक्यता असते. ज्या लोकांना चयापचयची समस्या आहे अशांनी आहारात फणसाच्या बिया खाणे टाळावे.
फणसाच्या बिया खाण्याचे फायदे
-व्हिटॅमिन ए डोळ्यांसाठी आवश्यक पोषक आहे. व्हिटॅमिन ए असल्याने आपले केसही चांगले राहतात. फणसामध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी 6 आणि व्हिटॅमिन-सी असतात. व्हिटॅमिन-ए आपल्या डोळ्यांसाठी, व्हिटॅमिन बी 6 मेंदूसाठी आणि व्हिटॅमिन-सी रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त असते.
-जर आपल्याला चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करायच्या असतील तर यासाठी फणसाच्या बिया फायदेशीर आहेत. सर्वात अगोदर या बिया दूधात भिजवून ठेवा आणि नंतर याची बारीक पेस्ट तयार करा. दररोज ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर लावा. 25 मिनिटे ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर तशीच ठेवा आणि पाण्याने धूवा. यामुळे आपल्या चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतील.
(टीप : कोणत्याही उपचारापूर्वी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
संबंधित बातम्या :
पायांना सतत दुर्गंध येतोय? मग ‘या’ घरगुती टिप्स ट्राय करा नि समस्येतून मुक्त व्हा!
Papaya Seeds Benefit | तुम्ही पपईच्या बिया फेकून देताय…? तर थांबा अगोदर हे वाचा!
Health care | सकाळी अनवाणी पायांनी गवतावर चालणे आरोग्यासाठी लाभदायी, वाचा याचे फायदे… https://t.co/xnbkgfB8Ea #HealthTips | #Barefoot | #HealthCare
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 24, 2021
(Eating jackfruit seeds is dangerous to health)