उन्हाळ्याच्या हंगामात खरबूज खाणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर, वाचा
उन्हाळ्याच्या हंगामात आहारात जास्त फळांचा समावेश केला जातो. त्यात बहुधा अशी फळे असतात, ज्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण होते.
मुंबई : उन्हाळ्याच्या हंगामात आहारात जास्त फळांचा समावेश केला जातो. त्यात बहुधा अशी फळे असतात, ज्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण होते. ही फळे शरीराला थंड करण्याचे देखील काम करतात. या फळांमध्ये अनेक पोषक घटक असतात. आरोग्याच्या अनेक समस्या दूर करण्यात ते मदत करतात. खरबूज हे फळं उन्हाळ्यात खाणे आपल्या निरोगी आरोग्यासाठी खूप चांगेल असते. (Eating muskmelon is beneficial for health)
खरबूज खाल्ल्याने अनेक रोग आपल्यापासून दूर राहतात. त्यात चरबीचे प्रमाण खूप कमी असते. जर, तुम्हाला वजन कमी करायचे असेल, तर उन्हाळी आहारात खरबूज नक्की सामील करा. खरबूजमध्ये जीवनसत्त्वे अ, सी, बी 6, मॅग्नेशियम आणि फायबर आहेत. विशेष म्हणजे खरबूजमध्ये मोठ्या प्रमाणात जीवनसत्त्वे सी असते. यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास देखील मदत होते. सध्याच्या कोरोनाच्या काळात तर आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवर विशेष लक्ष दिले गेले पाहिजे. देशामध्ये कोरोनाच्या रूग्णांची संख्या ही वाढतच आहे.
यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यावर भर दिला पाहिजे. उन्हाळ्यात कलिंगड खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यात पुरेसे पाणी असते. तसेच यात अनेक पौष्टिक घटक असतात आणि कॅलरीजचे प्रमाणही कमी असते. हे फळ खाल्ल्याने तुमचे शरीर हायड्रेटेड राहते आणि अधिकवेळ भूकही लागत नाही. ननसामध्ये कॅलरींचे प्रमाण कमी आहे. पण, त्यात भरपूर फायबर आणि व्हिटामिन सी आहे. हे आपल्या पोटावरील चरबी कमी करण्यास मदत करते. या व्यतिरिक्त हे चयापचय वाढवण्याचे कामही करते.
लीची हे एक फळ आहे. त्याची चव गोड असते. त्याचा रंग लाल आणि पांढरा असतो. त्याच्या सुगंध आणि चवीमुळे हे बर्याच पदार्थांमध्ये आणि कॉकटेलमध्ये वापरले जाते. हे फळ आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. लीचीच्या झाडाचे साल, बिया, पानेही फार औषधी आहेत. घरात लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच स्ट्रॉबेरी खाण्यासाठी खूप आवडते. स्ट्रॉबेरी खाण्यासाठी जेवढी चवदार आहे तेवढीच आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. स्ट्रॉबेरी शरीरातील अनेक खनिजे आणि जीवनसत्त्वे यांची कमतरता पूर्ण करू शकते.
संबंधित बातम्या :
Skin Care Tips | लग्न करताय? ना ब्यूटी पार्लर, ना ट्रिटमेंट, ‘या’ घरगुती उपायांनी मिळवा ग्लो!
Eczema Myth | ‘एक्झिमा’ आजाराबद्दल लोकांमध्ये संभ्रमाची स्थिती, जाणून घ्या या मागचं पूर्ण सत्य…#eczema | #Health | #skincare | #skincareproducts https://t.co/azKyegZj0a
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 26, 2021
(Eating muskmelon is beneficial for health)