दररोज सकाळी रिकाम्या पोटी कांदा खाणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर, वाचा याबद्दल अधिक !
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणे महत्वाचे झाले आहे.
मुंबई : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणे महत्वाचे झाले आहे. कोरोनापासून दूर राहण्यासाठी सर्वात महत्वाची आहे म्हणजे आपली रोगप्रतिकारक शक्ती, कारण जर तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असेल तर कोरोनाच नाहीतर अनेक आजार तुमच्यापासून दूर राहतील. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी कांदा अत्यंत फायदेशीर आहे. (Eating onions is beneficial to boost the immune system)
कांद्यात मोठ्या प्रमाणात प्रोटीन, कार्बोहायड्रेट, व्हिटॅमिन, कॅल्शियम, खनिज, फॉस्फोरस, कॅलरी, लोह असते. तसेच कांदा आपल्या शरीरातील पाण्याची कमतरताही भरून काढतो. विशेष म्हणजे कच्चा कांदा खाल्ल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. भरपूर प्रमाणात कांदा खाल्ल्यास अनेक समस्यांचा त्रास कमी देखील होतो. कांद्यात अँटी बॅक्टेरियल गुण असतात. अँटी बॅक्टेरियल गुणांमुळे हा कांदा खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते.
कच्चा कांदा रक्तदाब नियंत्रित करतो. कांद्यात मिथाईल सल्फाइड आणि अमिनोऍसिड असते. त्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतो आणि हृदयासंबंधित समस्या कमी होतात. जर हायस्टीरियाचा रोगी बेशुद्ध झाला असेल तर, कांदा कुटून नाकाला लावल्यास तो लगेच शुद्धीत येतो. कांद्यामध्ये व्हिटॅमिन ए अधिक असल्याने डोळ्यांची दृष्टी सुधारण्यास मदत होते.वारंवार सर्दी, खोकल्याचा त्रास होत असेल तर, कांद्याचा ताजा रस प्यावा.
या रसात गूळ किंवा मध मिसळून प्यायल्याने अधिक गुणकारी ठरेल. नियमित कांदा खाल्ल्याने शरीरात नैसर्गिकरित्या इन्सुलिन तयार होते. मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी दररोज जेवणाबरोबर सलाडच्या स्वरूपात कांदा खाल्ल्यास, त्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल. केसगळतीपासून मुक्ती मिळवण्यासाठी कांदा खूपच फायदेशीर आहे.
(टीप : कोणत्याही कृतीपूर्वी डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्या.)
संबंधित बातम्या :
Weight Loss | ‘वेट लॉस जर्नी’दरम्यान वारंवार वजन तपासताय? मग ‘या’ गोष्टी आधी जाणून घ्या!
Coconut Water | रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त ‘नारळ पाणी’, वाचा याचे फायदे…
चपाती खाल्यानंतर ‘ही’ चूक अजिबात करु नका, आरोग्यास होऊ शकतं नुकसानhttps://t.co/YhmdUa5Ut6 #HealthTips | #Health | #Lifestyle | #Tv9Marathi
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 31, 2020
(Eating onions is beneficial to boost the immune system)