Health Benefits of Paneer : स्वादिष्ट असण्याबरोबरच आरोग्यासाठीही फायदेशीर ‘पनीर’, वाचा !
पनीर खाणे आपल्या निरोगी आयुष्यासाठी खूप महत्वाचे आहे. पनीरमध्ये पोटॅशियम, सेलेनियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि झिंक इत्यादी अनेक पोषक घटक असतात.
मुंबई : पनीर खाणे आपल्या निरोगी आयुष्यासाठी खूप महत्वाचे आहे. पनीरमध्ये पोटॅशियम, सेलेनियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि झिंक इत्यादी अनेक पोषक घटक असतात. पनीर आपल्याला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या निरोगी ठेवते. आरोग्याच्या अनेक समस्यांवर मात करण्यासाठी पनीर मदत करते. चला जाणून घेऊयात पनीर खाण्याचे फायदे…(Eating Paneer is beneficial for health)
कर्करोगासाठी – पनीरमध्ये व्हिटॅमिन डी, कॅल्शियम आणि प्रथिने असतात. पनीरमध्ये कॉंज्युगेटेड लिनोलिक अॅसिड असते. यामुळे कर्करोगाचा धोका कमी होतो. त्यात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी देखील असते. यामुळे स्तनाचा कर्करोगाचा धोका कमी होतो.
हाडे मजबूत करण्यासाठी – हाडे मजबूत करण्यासाठी कॅल्शियम आवश्यक आहे. पनीरमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस मोठ्या प्रमाणात असते. हे हाडे मजबूत करण्यास मदत करते. पनीरमध्ये व्हिटॅमिन बी आणि ओमेगा -3 फॅटी अॅसिड हाडे मजबूत करण्यास मदत करतात.
पाचक प्रणाली निरोगी – पनीरमध्ये फॉस्फरस आणि फायबर असतात. हे पाचन तंदुरुस्त ठेवण्यास मदत करतात. पोटदुखीच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी आपण आहारात पनीर घेतले पाहिजे.
ब्लड प्रेशरच्या समस्येसाठी – पनीरमध्ये पुष्कळ पोषक असतात. त्यात पोटॅशियम देखील असते. हे मेंदू आणि स्नायूंचा त्रास दूर करते. यामुळे ब्रेन स्ट्रोकचा धोका कमी होतो. तसेच तणाव कमी करण्यात मदत होते.
लिव्हरसाठी फायदेशीर – पनीरचं नियमित सेवन केल्याने शरीरात रक्ताची कमतरता निर्माण होत नाही. तसेच, लिव्हर मजबूत राहते. वाढत्या वयासोबत उद्भवणाऱ्या समस्यांपासून बचाव करण्यात पनीरच सेवन फायदेशीर ठरतं. पनीरच नियमित सेवन केल्यान सांधेदुखी समस्या दूर राहते.
हेही वाचा एका वेळेत केवळ 100 ग्रॅम पनीर शरीराला पुरेसं असतं. तसेच, रात्री उशिरा पनीर खाऊ नये. पनीर नेहमी वेगवेगळ्या भाज्यासोबत मिक्स करून खावं. त्यातील प्रोटीन आणि फायबरमुळे पोट खूप वेळेसाठी भरलेलं जाणवतं. पनीर आणि हंगामी भाज्या बरोबर प्रमाणात खाव्यात, कारण पनीरमध्ये सोडियमचं प्रमाण खूप असतं जे भाज्यांमध्ये असलेल्या पोटॅशियमसोबत मिसळून हाय फायबर डाएटमध्ये रूपांतरीत होतं.
(टीप : कोणताही उपचार करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
संबंधित बातम्या :
Pain Killer Side Effects | हलक्याशा वेदनांसाठीही ‘पेन किलर’ घेताय? किडनी होऊ शकते निकामी!
Immunity Booster | थंडीच्या दिवसांत आवळ्याचा रस आरोग्यवर्धक, इम्युनिटी वाढवण्यासाठी ‘हे’ नक्की ट्राय करा!https://t.co/XPmKiIDsHE#ImmunityBooster #AmlaJuice
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 28, 2020
(Eating Paneer is beneficial for health)