रताळे खा, रोगप्रतिकार शक्ती वाढवा आणि राहा आजारांपासून दूर

रताळे नाव निघाले की आपल्याला आठवण होते ती, म्हणजे उपावासाची कारण आपल्यापैकी जवळपास सर्वचजण रताळे उपवासाला खातात.

रताळे खा, रोगप्रतिकार शक्ती वाढवा आणि राहा आजारांपासून दूर
रताळे
Follow us
| Updated on: Apr 12, 2021 | 10:04 AM

मुंबई : रताळे नाव निघाले की आपल्याला आठवण होते ती, म्हणजे उपावासाची कारण आपल्यापैकी जवळपास सर्वचजण रताळे उपवासाला खातात. मात्र, आपल्याला हे माहिती आहे का? की, रताळे खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. यामुळे दररोज आहारात रताळ्याचा समावेश केला पाहिजे. (Eating Sweet potato boosts the immune system)

रताळे कच्चे, उकडून, भाजून किंवा त्यापासून एखादा चमचमीत पदार्थ बनवून खाण्यासाठी वापरतात. रताळ्यात व्हिटॅमिन ए मोठ्या प्रमाणात आढळते. यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी मदत होते. पोटॅशियम असलेले रताळे उच्च रक्तदाब आणि हृदयाच्या समस्यांपासूनही बचाव देखील होतो.

-रताळ्यात लोह, फोलेट, तांबे, मॅग्नेशियम आणि जीवनसत्त्वे असतात, जे तुमची रोगप्रतिकार शक्ती बळकट करतात. हे खाल्ल्याने तुमची त्वचा चमकदार होते. तसेच, चेहऱ्यावर अकाली सुरकुत्या येत नाहीत. त्यामध्ये उपस्थित व्हिटामिन सी त्वचेमध्ये कोलेजेन तयार करतो, जे आपल्याला नेहमी तरुण आणि सुंदर दिसण्यात मदत करतात.

-त्यामध्ये सामान्य प्रमाणात कॅलरी आणि स्टार्च असतात. त्याच वेळी, संतृप्त चरबी आणि कोलेस्टेरॉलचे प्रमाण अतिशय कमी असते. त्यात फायबर, अँटी-ऑक्सिडेंट्स, जीवनसत्त्वे आणि ग्लायकोकॉलेट्स आढळतात.

-वजन वाढण्यात अन्नातल्या उर्जाचा सर्वात मोठा वाटा असतो. रताळ्यात कॅलरीजचं प्रमाण प्रत्येकी 100 ग्रॅम मागे फक्त 90 एवढं कमी असतं.

-या कंदमूळाच्याच्या सेवनाने शरीरात रक्ताची वाढ होते आणि त्याचबरोबर ते आपल्या शरीरातील कार्यशक्ती देखील वाढवते. त्यात असलेले व्हिटामिन बी 6 हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

-जर काही खाल्ल्यानंतर तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढली, तर रताळे खाणे चांगले. यासह, रक्तातील साखर नेहमीच नियंत्रित राहते आणि मधुमेहदेखील वाढू डेत नाही.

संबंधित बातम्या : 

Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो

Papaya Seeds Benefit | तुम्ही पपईच्या बिया फेकून देताय…? तर थांबा अगोदर हे वाचा!

(Eating Sweet potato boosts the immune system)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.