टोमॅटो खाण्याचे ‘हे’ जबरदस्त फायदे नक्की वाचा !

आपल्या रोजच्या आहारात टोमॅटो जवळजवळ प्रत्येक भाजीमध्ये टाकला जातो.

टोमॅटो खाण्याचे ‘हे’ जबरदस्त फायदे नक्की वाचा !
टोमॅटो
Follow us
| Updated on: Apr 08, 2021 | 9:09 AM

मुंबई : आपल्या रोजच्या आहारात टोमॅटो जवळजवळ प्रत्येक भाजीमध्ये टाकला जातो. भाजी किंवा आमटी शिवाय कोशिंबीरी, सॉस आणि सूप म्हणून देखील टोमॅटोचा वापर केला जातो. याव्यतिरिक्त एक नैसर्गिक सौंदर्य उत्पादन म्हणून देखील तो उपयुक्त ठरतो. टोमॅटोमध्ये व्हिटामिन सी, लाइकोपीन आणि पोटॅशियम हे घटक पर्याप्त प्रमाणात आढळतात. मात्र, तुम्हाला हे माहिती आहे का? की, दररोज एक टोमॅटो खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. (Eating tomatoes is beneficial for health)

-टोमॅटो हे चवीला काहीसे आंबट असतात, कारण यामध्ये सायटीक अॅसिड असते. याशिवाय टोमॅटोमध्ये प्रोटीन, व्हिटामिन्स, मिनरल्स आणि फायबरची मात्राही भरपूर असते. हे व्हिटामिन ए, व्हिटामिन सी, व्हिटामिन ई आणि व्हिटामिन के चा खूप चांगला स्त्रोत आहे. ही सर्व व्हिटामिन्स आरोग्यासाठी खूप चांगली मानली जातात.

-टोमॅटोमध्ये पोटॅशिअम आणि मँगनीज भरपूर प्रमाणात असते. तसंच टोमॅटो कॅल्शिअम, आर्यन, कॉपर, मॅग्नेशिअम, फॉस्फरस आणि झिंक यासारख्या तत्त्वांनी युक्त असतो. टोमॅटोमध्ये अँटीऑक्सिडेंट गुणही आढळतात,

-टोमॅटोमधील लाल रंग हा त्यातील लाइकोपीनमुळे प्राप्त होतो, जे आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे. याच कारणामुळे कच्चा टोमॅटो पिकल्यानंतर अजून प्रभावकारक ठरतो.

-टोमॅटोमध्ये कर्बोदकाचे प्रमाण अत्यंत कमी असते. यामुळे हाय कोलेस्टेरॉल, हृदयविकार, रक्तदाब, मधुमेह या विकारांमध्ये टोमॅटो गुणकारी आहे. यामुळे दररोज टोमॅटो खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

-वजन कमी करायचे असेल तर टोमॅटो खाणे खूप फायदेशीर आहे. आपण एक टोमॅटो खाल्ले तर बऱ्याच वेळ भूक लागत नाही आणि पोट भरल्यासारखे वाटते.

-ज्यांना वजन कमी करायचे आहे अशांनी दररोज सकाळी टोमॅटो खाल्ले पाहिजे. व्हिटामिन एची मात्रा असल्याने टोमॅटो डोळ्यांसाठी खूपच फायदेशीर आहे.

(टीप : कोणत्याही प्रकारच्या सेवानापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Kidney Stone | मुतखड्याच्या समस्येने त्रस्त आहात? मग, चुकूनही खाऊ नका ‘हे’ पदार्थ!

Skimmed  Milk | स्किम्ड दुधाचे सेवन करताय? थांबा! आधी जाणून घ्या याचे दुष्परिणाम…

(Eating s is beneficial for health)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.