कडू असल्यातरी अनेक रोगांपासून दूर ठेवतात ‘या’ भाज्या, वाचा फायदे

निरोगी आणि पौष्टिक आहार घेतल्याने केवळ शरीरच निरोगी ठेवता येते असे नाही तर, यामुळे आपण बर्‍याच आजारांपासून देखील दूर राहू शकतो.

कडू असल्यातरी अनेक रोगांपासून दूर ठेवतात 'या' भाज्या, वाचा फायदे
Follow us
| Updated on: Mar 27, 2021 | 2:08 PM

मुंबई : निरोगी आणि पौष्टिक आहार घेतल्याने केवळ शरीरच निरोगी ठेवता येते असे नाही तर, यामुळे आपण बर्‍याच आजारांपासून देखील दूर राहू शकतो. याची कल्पना आपल्यापैकी बऱ्याच जणांना असावी. चांगल्या आरोग्यासाठी पालेभाज्या खाणे खूप महत्वाचे आहे. आपण जर दररोज आहारामध्ये भाज्या खात असाल तर ते आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. यामुळे आपण अनेक रोगांपासून दूर राहू शकतो. (Eating vegetables in the diet is beneficial for health)

कारले चवीने कडू असलेले कारले आरोग्यासाठी अत्यंत चांगले आहे. आयुर्वेदानुसार कारले पित्तशामक, वातानुलोमक, कृमिघ्न व मूत्रल आहेत. कारल्याची पानेही ज्वरनाशक, कृमीनाशक व मूत्रल आहेत. कारल्यामध्ये कॅल्शिअम, लोह, फॉस्फरस ‘अ’ व ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात तर ‘ब’ जीवनसत्त्व थोडय़ा प्रमाणात असते. या सर्व औषधी गुणधर्मामुळे कारले ही शक्तीवर्धक, पुष्ठीकारक व सारक असल्यामुळे आहाराबरोबरच औषध म्हणूनही वापरतात.

पालक हिरव्या भाज्या आपली स्मरणशक्ती वाढविण्यास मदत करतात, हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. पालकात भरपूर प्रमाणात फोलेट, व्हिटॅमिन के, ई असते. हे घटक आपल्या मेंदूला चालना देण्याचे काम करतात. या व्यतिरिक्त आपण आपल्या आहारात कोबी, कोशिंबिरीसाठी वापरण्यात येणारा लेट्युस या हिरव्या भाज्या समाविष्ट करू शकता.

ब्रोकोली हिरव्या फ्लॉवर प्रमाणे दिसणारा ब्रोकोली आपली स्मरणशक्ती सुधारून, ती वाढवण्यास मदत करतो. त्यात व्हिटॅमिन के आणि कोलीन सारखे पोषक घटक असतात. ज्यामुळे आपला बुद्धी तीक्ष्ण होते. ब्रोकोलीचा आपल्या आहारात नियमित समावेश केल्यास आपल्या स्मरण शक्तीत वाढ होईलच. परंतु, अकाली येणारे वृद्धत्व देखील प्रतिबंधित होईल.

टोमॅटो टोमॅटो केवळ एक रसाळ आणि चवदार भाजी नाही, तर स्मरणशक्ती वाढविण्यासाठीच्या देखील खूप महत्त्वाचा घटक आहे. फोर्ब्सच्या संशोधनानुसार टोमॅटोमध्ये लाइकोपीनचे प्रमाण जास्त असते, जे आपल्या शरीरात अँटीऑक्सिडेंट म्हणून काम करते. टोमॅटो आपल्या पेशींना दुषित होण्यापासून वाचवतो. तसेच आपली स्मरणशक्ती वाढविण्यासही मदत करतो. टोमॅटो जवळजवळ सर्व भाज्या बनवताना वापरला जातो. तुम्हाला हवा असल्यास तुम्ही तो कच्चा देखील खाऊ शकता.

संबंधित बातम्या : 

(Eating vegetables in the diet is beneficial for health)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.