Walnuts Weight loss : वजन कमी करण्यासाठी आहारात घ्या ‘अक्रोड’, जाणून घ्या अधिक फायदे !
वाढलेले वजन अनेकांची मोठी समस्या बनले आहे. वजन कमी करण्यासाठी आपल्याला सर्वात अगोदर चरबीयुक्त पदार्थ खाणे टाळावे लागेल.
मुंबई : वाढलेले वजन अनेकांची मोठी समस्या बनले आहे. वजन कमी करण्यासाठी आपल्याला सर्वात अगोदर चरबीयुक्त पदार्थ खाणे टाळावे लागतील. आहारात चरबीयुक्त अन्न घेणे टाळल्यावर वजन कमी होण्यास मदत होते. आपण शक्यतो कॅलरीयुक्त अन्न आहारात घेतले पाहिजे. वजन कमी करण्यासाठी अक्रोड अत्यंत फायदेशीर आहेत. अक्रोड रात्री पाण्यात भिजू घाला आणि सकाळी खा. यामुळे आपल्या शरीरावरील अतिरिक्त चरबी जाण्यास मदत होते. (Eating walnuts is beneficial for weight loss)
वजन कमी करण्यासाठी अशा प्रकारे खा अक्रोड आपण बऱ्याच वेळा स्नॅक्समध्ये वेगवेगळे पदार्थ खातो. यामुळे आपले वजन वाढण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते. स्नॅक्समध्ये ओटस घ्यावे आणि त्यामध्ये अक्रोड मिक्स करून खावे. अक्रोड खाल्ल्याने तुम्हाला लवकर भूक देखील लागत नाही. अक्रोड खाल्ल्याने आपले पोट बराच काळ भरल्यासारखे वाटते. अक्रोड खाल्ल्याने आपले चयापचय वाढते. ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. दररोज अक्रोड खाल्ल्याने हृदयरोग, मधुमेह आणि लठ्ठपणाचा धोका कमी होतो.
अक्रोड खाण्याचे इतर फायदे
खोकल्यासाठी फायदेशीर – तेलात अक्रोड फ्राय करा त्यात चवीनुसार पिठी साखर घाला. हे दिवसातून दोन ते तीन वेळा खा. यामुळे कोरडा खोकला नाहीसा होईल. अक्रोडाच्या वाळलेल्या खोडाची साल घ्या, त्याची पावडर करा त्यात चिमूटभर लवंग मिसळून दंत पावडर म्हणून तुम्ही वापरू शकता.
हृदयासाठी फायदेशीर – अक्रोडमध्ये 19 पेक्षा जास्त जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. अक्रोडमध्ये मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि मॅंगनीजदेखील मोठ्या प्रमाणता आढळते. याशिवाय ओमेगा 3, फॅटी अॅसिडस् आणि लिनोलिक अॅसिडदेखील अक्रोद्मध्ये आढळते. अक्रोडचे हे गुणधर्म हृदयाला सुरक्षित ठेवतात.
दातांसाठी फायदेशीर – अक्रोड खाणे आपल्या दातांसाठी खूप फायदेशीर आहे. अक्रोडच्या झाडाच्या सालातून तयार केलेली पेस्ट ही हिरड्या आणि दातांच्या इतर समस्यांवरील उपचारांसाठी वापरली जाते.
त्वचेसाठी फायदेशीर – अक्रोडमध्ये ओमेगा-3 हा घटक असतो, जो त्वचेतील कोलेजन वाढवण्यास मदत करतो. अक्रोड हे स्कीन स्क्रबसाठी वापरला जाणारा मुख्य घटक आहे. मात्र, या व्यतिरिक्त अक्रोड आपल्याला अनेक आजारांपासून देखील दूर ठेवतो.
संबंधित बातम्या :
Coconut Water | रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त ‘नारळ पाणी’, वाचा याचे फायदे…
High Blood Pressure | केवळ मीठच नव्हे, उच्च रक्तदाब असणाऱ्या रुग्णांनी चुकनही खाऊ नयेत ‘या’ गोष्टी!
Health care | सकाळी अनवाणी पायांनी गवतावर चालणे आरोग्यासाठी लाभदायी, वाचा याचे फायदे… https://t.co/xnbkgfB8Ea #HealthTips | #Barefoot | #HealthCare
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 24, 2021
(Eating walnuts is beneficial for weight loss)