Health Tips For Urine Issue | कमी पाणी पिऊनही जावं लागत असेल सतत लघूशंकेला तर जाणून घ्या त्याची कारणे
आपल्या सगळ्यानाच अनेकदा भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. त्याचे मुख्य कारण असते शरीरातील अनेक समस्यांना दूर करणे. पण अनेकदा पाणी कमी पिऊनही सतत लघूशंका करण्याचा त्रास अनेक जणाना होत असतो. त्याची कारणेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
मुंबईः हिवाळा (Winter) सुरू झाला की, आपण सर्वच जण चांगल्या खाण्यापिण्याकडे आपण दुर्लक्ष करतो. थंडीच्या दिवसामध्ये अनेकदा असं होते की, पाणी कमी पिऊनही सतत लघूशंकेला जावे लागते. अशा वेळी आपण अनेक वेळा पाणी कमी पितो. हिवाळ्यामध्ये पाच सहा वेळा लघूशंकेला जाणे यामध्ये काही विशेष नाही. तरीही असे जे खूप लोक आहेत जे पाणी कमी पिऊनही अनेकदा लघूशंकेला जातात. आपल्यालाही लघूशंकेला सतत जावे लागत असेल तर त्याची कारणे (Health Tips) जाणून घ्या.
आरोग्यतज्ज्ञांच्या मते सतत लघूशंका करणे याची वेगवेगळी कारणे असू शकतात. तरीही एखादी व्यक्ती 24 तासात 4 ते 10 वेळा वॉशरूमला जाऊ शकते. वॉशरूमला (Toilet) किती वेळी जाणे हे तुमच्या वयानुसार,औषधोपचार, रक्तदाब आणि मूत्राशयावर अवलंबून असते.
एकाद्या निरोगी व्यक्तीला सतत लघूशंकेला जावं लागत असेल तर त्याचे मुख्य कारण असू शकते मुत्राशय अधिक सक्रिय असणे. त्यांना कितीतरी वेळा टॉयलेटला जावे लागते. शरीरात मुत्राशयाची लघवी गोळा करण्याची क्षमचा कमी होऊ लागते किंवा त्याच्यावर दबाव येतो तेव्हा ही समस्या उद्बभवू शकते.अशा स्थितीत थोडे पाणी पिल्यानंतरही लघवी थांबणे कठीण होते.
शरीरात साखरेचे प्रमाण वाढले तर…
जे लोक मधुमेहाचे रुग्ण असतात त्यांनाही सतत लघूशंकेला जावे लागते. शरीरात मधुमेहाचे प्रमाण वाढले की, या समस्येपासून खूप त्रास त्या लोकांना होतो. यावेळी लघूशंका करताना जळजळणे असा त्रासही संभवू शकतो.
मूत्रशयाचा संसर्गामुळे होऊ शकतो त्रास
जर तुम्हाला अचानक वारंवार लघवी होत असेल आणि तुम्हाला सौम्य ताप आणि मळमळ होत असेल तर ते मूत्रशयाच्या संसर्गामुळे होत असते. महिलांना मूत्रशय संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते. या अवस्थेत वारंवार शौचास जाण्याबरोबरच जळजळ आणि दुखण्याचा त्रासदेखील जाणवतो.