वयाच्या 48 व्या वर्षातही ऐश्वर्या इतकी सुंदर कशी दिसते? तुम्ही तिच्या ‘पॉकेट फ्रेंडली ब्युटी’ रुटीनचा करा अवलंब!

ऐश्वर्या रायचे सौंदर्य रहस्य ऐश्वर्या राय बच्चनचे वय 48 वर्षे आहे, पण तिला पाहून तिच्या वयाचा अंदाज लावता येणे सहजा सहजी शक्य होत नाही. या वयातही ती, विशीतल्या नायिकांना सौंदर्याच्या बाबतीत तगडी टक्कर देते. जाणून घ्या, ऐशच्या या सौंदर्याचे रहस्य.

वयाच्या 48 व्या वर्षातही ऐश्वर्या इतकी सुंदर कशी दिसते? तुम्ही तिच्या ‘पॉकेट फ्रेंडली ब्युटी’ रुटीनचा करा अवलंब!
aishwarya raiImage Credit source: instagram
Follow us
| Updated on: Jun 20, 2022 | 1:03 PM

जेव्हा केव्हा सौंदर्याचा विषय चर्चिला जातो,आजही ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) हिचेच नाव तोंडावर येते. ऐश्वर्या आता 48 वर्षांची झाली आहे, पण तिच्या वयाची झलक अजूनही तिच्या चेहऱ्यावर उमटत नाही. सौंदर्याच्या बाबतीत ती आजही नवनवीन नायिकांना मागे टाकते. वाढत्या वयानुसार चेहऱ्यावर वृद्धत्वाची चिन्हे दिसू लागतात. जसजसे वय वाढत जाते तसतसे त्वचेतील आर्द्रता हळूहळू कमी होत जाते. त्यामुळे त्वचेची लवचिकता आणि कोरडेपणा, डाग, पिगमेंटेशन, फ्रिकल्स, सुरकुत्या (Wrinkles) इत्यादी समस्या जाणवू लागतात. परंतु, ऐश्वर्या राय बच्चन अद्यापही तरुण आणि तेजस्वी चेहऱयाने वावरतांना दिसते. सहसा, अभिनेत्रींकडे पाहून, आपल्याला असे वाटते की त्या चेहऱ्यावर खूप महाग उत्पादने (Expensive products) वापरत असतील, परंतु ऍश या बाबतीत पूर्णपणे देसी आहे. तिच्या ब्युटी टिप्स पॉकेट फ्रेंडली आहेत, ज्या कोणीही सहज वापरून पाहू शकतो.

भरपूर पाणी प्या

असे म्हटले जाते की, जर तुम्हाला त्वचा चमकदार ठेवायची असेल तर ती, हायड्रेटेड ठेवा आणि हे करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे पाणी. तुम्ही भरपूर पाणी प्यायल्यास तुमच्या शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात आणि तुमची त्वचा हायड्रेट राहते. यामुळे तुमच्या चेहऱ्यावर वृद्धत्वाची चिन्हे लवकर दिसत नाहीत. ऍश याची पूर्ण काळजी घेते आणि भरपूर पाणी पिते. ती दिवसातून किमान 10 ते 12 ग्लास पाणी ग्रहण करते.

अरोमा थेरपी

जास्त ताण घेतल्यास त्याचा परिणाम त्वचेवरही दिसून येतो. ऍश स्वतःला तणावमुक्त ठेवण्यासाठी अरोमा थेरपी घेते. यासाठी ती चंदनाचे तेल वापरते. तसेच, ती दिवसाची सुरुवात योगाने करते. योगामुळे तिचे शरीर आणि मन दोन्ही तंदुरुस्त राहतात. ऍशचा असा विश्वास आहे की तुम्ही जितके जास्त स्वतःला आनंदी ठेवता तितकी तुमची त्वचा अधिक सुंदर दिसेल.

नैसर्गिक फेस पॅक वापरणे

ऍश तिची त्वचा सुधारण्यासाठी महागड्या उत्पादनांऐवजी नैसर्गिक फेस पॅक वापरते. यासाठी ती बेसन, हळद आणि दूध यांचा फेस पॅक वापरते. हा पॅक एक दिवस लावल्यानंतर ती दुसऱ्या दिवशी चेहऱ्यावर दही मास्क लावते. अशा प्रकारे ती अल्टरनेट देान प्रकाराने चेहर्याचे पोषण घडवून आणते. त्वचेवर ताजेपणा आणण्यासाठी ती काकडीचा रस चेहऱ्यावर लावते. ऍश तिचा चेहरा नेहमी तजेलदार (हायड्रेटेड) ठेवण्याचा प्रयत्न करते.

निरोगी अन्न घ्या

ऍशचा असा विश्वास आहे की त्वचा सुंदर ठेवण्यासाठी असे पदार्थ खाल्ले पाहिजेत ज्यामुळे त्वचा आतून चमकदार होते. यासाठी ती फास्टफूड आणि जास्त मसालेदार आणि स्निग्ध पदार्थ टाळते आणि अधिकाधिक सॅलड्स, फळे आणि हिरव्या भाज्या आहारात घेते.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.