AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Causes Of Excessive Sweating: जास्त घाम येणे असू शकते मधुमेहाचे लक्षण ?

 एसी किंवा फॅनखाली बसल्यानंतरही खूप घाम येत असेल तर हे एखाद्या आजाराचे लक्षण असू शकते.

Causes Of Excessive Sweating: जास्त घाम येणे असू शकते मधुमेहाचे लक्षण ?
| Updated on: Oct 10, 2022 | 2:47 PM
Share

घाम (sweat)येणे हे आरोग्यासाठी चांगले असते, असे मानले जाते. घाम आल्यामुळे शरीरातील विषारी घटक (toxins)बाहेर पडण्यास मदत होते. जिम, व्यायाम, स्वयंपाक करणे, धावणे किंवा कोणतीही शारीरिक क्रिया करताना घाम येणे हे सामान्य मानले जाते. मात्र एसी किंवा फॅनखाली बसल्यानंतरही खूप घाम येत असेल तर हे एखाद्या आजाराचे लक्षण असू शकते. जास्त घाम येणे हे मधुमेहाचे (diabetes)लक्षण असू शकते.

जेव्हा रक्तातील साखरेची पातळी वाढते किंवा कमी होते तेव्हा थंड घाम येऊ शकतो. बरेच लोक घाम येण्याकडे लक्ष देत नाहीत, परंतु ही एखाद्या मोठ्या आजाराची सुरुवात असू शकते. मधुमेहाव्यतिरिक्त, आरोग्याच्या इतर समस्यांमुळेही जास्त घाम येऊ शकतो. घाम कशामुळे जास्त येतो, हे जाणून घेऊया.

उद्भवू शकते हृदयाची समस्या – गरजेपेक्षा जास्त घाम येणे हे हदयविकाराची समस्या सूचित करते. हेल्थलाइननुसार, एखाद्या व्यक्तीला कोणतीही शारीरिक हालचाल न करताच घाम येत असेल तर त्यामागचे कारण हृदयविकार हेही असू शकते. रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्यामुळे हृदयाला रक्ताभिसरणासाठी अधिक मेहनत घ्यावी लागते, ज्यामुळे शरीरात जास्त थकवा आणि ताण येऊ शकतो. या ताणामुळेही जास्त घाम येऊ शकतो.

कॅन्सर असू शकते कारण – कॅन्सर झाल्यावर शरीरात अनेक बदल होतात. ज्यामध्ये एक बदल म्हणजे, जास्त घाम येणे. कॅन्सर झाल्यास शरीरातील अनेक अवयव व्यवस्थितपणे काम करू शकत नाहीत, त्यामुळे शरीराचे कार्य नियमितपणे करण्यासाठी खूप प्रयत्न, मेहनत करावी लागते. त्यासोबतच कॅन्सर झाल्यावर अधिक उष्णता जाणवत राहते. हृदयाची धडधडही वेगवान होते, त्यामुळेही जास्त घाम येऊ शकतो.

औषधांचा दुष्परिणाम असू शकतो – बऱ्याच वेळेस औषधांचे अधिक सेवन केल्यासही जास्त घाम येण्याची समस्या उद्भवू शकते. औषधांमध्ये असणारे कंपाऊंड्स शरीरात उष्णता निर्माण करतात. ज्यामुळे तुम्हाला चिंता वाटू लागते तसेच बेचैन वाटणे किंवा अस्वस्थ वाटणे, असा त्रासही सहन करावा लागू शकतो. जे लोक स्टेरॉइड्सचे सेवन करतात, त्यांना औषधांमुळे दुष्परिणाम होऊ शकतात ज्यामुळे अधिक घाम येऊ शकतो.

मेनोपॉजची समस्या – मेनोपॉज (रजोनिवृत्ती) हेही महिलांना जास्त घाम येण्याचे कारण असू शकते. मेनोपॉजमुळे महिलांच्या शरीरात अनेक हार्मोनल बदल होतात, ज्यामुळे जास्त घाम येणे, डोकेदुखी, चक्कर येणे आणि वजन वाढणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल.
दमानियांचा सुषमा अंधारे यांना पाठिंबा; शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी
दमानियांचा सुषमा अंधारे यांना पाठिंबा; शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी.
सनसनाटी निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न! शंभूराज देसाईंचा टोला
सनसनाटी निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न! शंभूराज देसाईंचा टोला.
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.