झटपट तयार करा गूळ, तुळशीचा काढा आणि वाढवा रोगप्रतिकारक शक्ती
तुळशीच्या पानांमध्ये अँटी-बॅक्टेरियल घटक असतात, जे खोकला, सर्दी, पडसे यासारख्या समस्यांना आपल्यापासून दूर ठेवतात आणि श्वसन प्रणालीला अधिक बळकट बनवतात.
मुंबई : तुळशीच्या पानांमध्ये अँटी-बॅक्टेरियल घटक असतात. जे खोकला, सर्दी, पडसे यासारख्या समस्यांना आपल्यापासून दूर ठेवतात आणि श्वसन प्रणालीला अधिक बळकट बनवतात. याशिवाय तुळशीची पाने पाचन समस्या दूर करतात. विशेष म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास तुळशीची पाने अत्यंत फायदेशीर आहेत. आज आम्ही तुम्हाला तुळशीच्या पानापासून तयार होणारे एक खास पेय सांगणार आहोत. ज्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होईल. (Extract jaggery and basil is beneficial for boosting the immune system)
हा काढा तयार करण्यासाठी आपल्याला जास्त साहित्यही लागणार नाही. अत्यंत कमी वेळात हा काढा तयार होतो. हा काढा तयार करण्यासाठी आपल्याला सात ते आठ तुळशीची पाने लागणार आहेत आणि गूळ लागणार आहे. एक ग्लास पाणी मध्यम आचेवर गरम करण्यासाठी ठेवा आणि त्यामध्ये गुळ आणि तुळशीची पाने मिक्स करा. दहा मिनिटे हे गरम करण्यासाठी ठेवा. एका ग्लासमध्ये हा काढा घ्या आणि गरम असतानाच प्या. हा काढा तयार करणे देखील खूप सोप्पे आहे. हा काढा दररोज आहारात घेतल्याने अनेक फायदे आपल्या शरीराला होतात.
तुळशीचा काढा पिल्याने शरीरातील विषारी द्रव्य सहजपणे बाहेर पडतात. तुळशीमध्ये अँटी-बॅक्टेरियाचे गुणधर्म आहेत. ते आपल्याला सर्दी आणि खोकल्यापासून वाचविण्यात मदत करतात. तुळसमध्ये अँटीऑक्सिडेंट गुणधर्म आहेत. ते आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. संसर्ग टाळण्यासाठी फुफ्फुसांना मदत करतात. तुळशीमध्ये अँटिप्रेसस गुणधर्म आहेत. ते आपल्याला तणावमुक्त करतात. ते शरीरात कार्टिझोल पातळी संतुलित करतात. तुळशीत एंटी-डिप्रेससन्ट गुणधर्म आहेत. यामुळे अनेक रोग आपल्यापासून दूर राहतात.
गुळात व्हिटॅमिन-ए आणि व्हिटॅमिन-बी, सुक्रोज, ग्लूकोज, लोह, कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, जस्त, मॅग्नेशियम या सारखे घटक आढळतात. विशेषतः गुळात फॉस्फरसचे प्रमाण अधिक असते. गुळामध्ये शरीराला आवश्यक असणारी अनेक खनिजे आणि जीवनसत्त्वे आढळतात. जे आपल्या त्वचेसाठी नैसर्गिक क्लींजर म्हणून काम करतात. हे घटक शरीराला आतून स्वच्छ ठेवून त्वचेला चमकदार बनवतात. त्याचबरोबर गुळ शरीराचे तापमान नियंत्रित करण्यास मदत करतो.
(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या :
Coconut Water | रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त ‘नारळ पाणी’, वाचा याचे फायदे…
Ginseng Benefits : शतावरीचा औषधी वनस्पती म्हणून प्राचीन काळापासून वापर, काय आहेत फायदे वाचा!https://t.co/jXEW9APpXz | #GinsengBenefits | #immunityboostertips | #immunity | #immunityboost | #Healthcare | #Ginseng | #lifestyle |
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 31, 2021
(Extract jaggery and basil is beneficial for boosting the immune system)