Eyes: डोळे कधीच धोका देत नाहीत! डोळे देतात ‘या’ धोकादायक आजारांचे संकेत; दुर्लक्ष करण्याची चूक अजीबात करू नका!
आजवर डोळ्यांवर तुम्ही अनेक कविता, गाणी ऐकली असतील मात्र हेच डोळे तुमचे चांगले किंवा वाईट आरोग्य सांगू शकतात. डोळ्यांमध्ये दिसणाऱ्या या लक्षणांकडे लोक दुर्लक्ष करतात. ज्यामुळे नंतर अधिक गंभीर समस्यांना सामोरे जावे लागते. तुम्हालाही स्वतःच्या डोळ्यात अशी चिन्हे दिसत असतील तर त्याकडे मुळीच दुर्लक्ष करू नका.
कोणाला बघायला त्रास होत असेल अस्पष्ट दिसत असेल, अंधूक दृष्टी (Blurred vision) किंवा डोळ्यांमध्ये रेषा दिसत असतील तर, तत्काळ डोळ्यांची तपासणी करावी. डोळ्यांद्वारे कोणाचेही आरोग्य कळू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे. जर एखाद्या व्यक्तीला बऱ्याच काळापासून डोळ्यांमध्ये काही समस्या असेल तर ते, गंभीर आजाराचे लक्षण (Symptoms of serious illness) असू शकते. डोळ्यांमुळे तुमचे आरोग्य चांगले आहे किंवा वाईट ते सांगता येते. म्हणूनच डॉक्टरही तपासनी करतांना सर्वात पहिले रुग्णांचे डोळे पाहत असतात.
डोळ्यांमध्ये दिसणाऱ्या या लक्षणांकडे लोक दुर्लक्ष करतात. ज्यामुळे नंतर अधिक गंभीर समस्यांना सामोरे जावे लागते. तुम्हालाही स्वतःच्या डोळ्यात अशी चिन्हे (Such signs in the eye) दिसत असतील तर त्याकडे मुळीच दुर्लक्ष करू नका. जर तुम्हाला तुमच्या डोळ्यांमध्ये खालीलपैकी कोणतीही चिन्हे दिसली तर ताबडतोब डॉक्टरांना भेटा.
1) पांढरे डाग (White spots)
तज्ञ म्हणतात की, जर एखाद्याच्या कॉर्नियावर पांढरे डाग दिसत असेल तर ते, धोक्याचे संकेत मानले पाहिजे. असे पांढरे डाग कॉर्निया संसर्गाचे लक्षण असू शकते. हळूहळू यामुळे डोळ्यांचे नुकसान होऊ शकते, म्हणून ताबडतोब डोळ्यांच्या डॉक्टरांना भेटा.
2) डोळ्यांची फडफड (twitches)
अल्कोहोल, कॅफीन किंवा निकोटीनच्या अतिसेवनामुळे डोळे मिचकवणे सामान्य आहे, परंतु जर एखाद्याच्या डोळ्यांच्या पापण्या सामान्य दिवसातही वारंवार फडफडत असतील तर ते बर्नआउटचे प्राथमिक लक्षण असू शकते. बर्नआउट याला शारीरिक थकवा असे संबोधतात. जर तुमचे डोळे सतत फडफडत असतील तर याचा अर्थ शारीरिक श्रम आणि ताण-तणाव कमी करण्याची गरज आहे.
3) फुगीर लाल डोळा (Puffy and red eye)
सकाळी उठल्यानंतर तुमचे डोळे सुजलेले आणि लाल झाल्यास ते ऍलर्जी, संसर्ग किंवा अति थकवा यामुळे असू शकते. फुगलेल्या आणि लाल डोळे आपल्याला विश्रांतीची आवश्यकता असल्याचे संकेत देतात.
4) अंधूक दृष्टी(Blurred vision)
अस्पष्ट दिसणे केवळ अंधूक दृष्टीचे लक्षण नसून ते, मधुमेह आणि मोतीबिंदूचे लक्षण असू शकते. उच्च रक्तदाब, मधुमेह रेटिनाच्या रक्तवाहिन्यांना नुकसान पोहोचवू शकते. अशा स्थितीत क्षतीग्रस्त रक्तवाहिन्यांना सूज येते, त्यातून रक्त किंवा द्रव बाहेर पडू लागतो. यामुळे स्पष्टपणे दिसणे कठीण होते. अंधूक दृष्टी एक किंवा दोन्ही डोळ्यांमध्ये देखील येऊ शकते. ज्या लोकांची रक्तातील साखर नियंत्रणात राहते त्यांची दृष्टी स्पष्ट होऊ शकते. त्याच वेळी, मोतीबिंदू डोळ्यात प्रतिमा प्रवेशास प्रतिबंधितीत करते, त्यामुळे दृष्टी अस्पष्ट होते.
5) रिंग्ज(Rings)
जर एखाद्या व्यक्तीच्या डोळ्याच्या पांढऱ्या भागावर म्हणजेच कॉर्नियावर विशेष प्रकारचे वलय दिसले तर ते उच्च कोलेस्ट्रॉलचे लक्षण असू शकते. तुमचे कोलेस्टेरॉल जास्त राहिल्यास, त्याचे प्राथमिक लक्षणे डोळ्यात दिसू लागते कारण अशा स्थितीत लिपिड कॉर्नियाच्या बाहेरील बाजूस एक रिंग तयार करण्यास सुरवात करते. वयवर्षे 40 पेक्षा कमी वयाच्या लोकांनी त्यांच्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे आणि डोळ्यात वलय दिसल्यास ताबडतोब तज्ञाशी संपर्क साधावा.