केळी आणि कलिंगडचा फेसपॅक त्वचेसाठी जबरदस्त फायदेशीर, वाचा !
आपली त्वचा चांगली आणि चमकदार ठेवण्यासाठी अनेकजण विविध उपाय करतात. चमदार त्वचा मिळवण्यासाठी, विविध सौंदर्य उत्पादनांचा वापर देखील केला जातो.
मुंबई : आपली त्वचा चांगली आणि चमकदार ठेवण्यासाठी अनेकजण विविध उपाय करतात. चमदार त्वचा मिळवण्यासाठी, विविध सौंदर्य उत्पादनांचा वापर देखील केला जातो. परंतु, आपणास माहित आहे का?, की या महागड्या उत्पादनांऐवजी काही चांगल्या सवयींचा अवलंब करून देखील आपण निरोगी त्वचा मिळवू शकता. असे काही फळ आहेत, ज्याचा उपयोग करून आपण घरचे घरची फेसपॅक तयार करू शकता. (Face pack of banana and watermelon is beneficial for the skin)
केळी आणि कलिंगडचा फेसपॅक घरी तयार करण्यासाठी साहित्य खालीलप्रमाणे लागेल
-एक पिकलेली केळी
-एक वाटी कलिंगड
-मध
-दूध
सुरवातीला केळीचे लहान-लहान काप करून घ्या आणि त्यामध्ये कलिंगडचा रस मिक्स करा. त्यामध्ये मध आणि दूध मिक्स करा. ही पेस्ट व्यवस्थितपणे मिक्स करून घ्या आणि चेहऱ्याला लावा. साधारणपणे ही पेस्ट 20 ते 25 मिनिटे चेहऱ्याला लावा आणि त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. आपण आठवड्यातून चार ते पाच वेळा चेहऱ्याला लावा. यामुळे आपली त्वचा सुंदर होईल. मात्र, हा फेसपॅक चेहऱ्याला लावताना हे लक्षात ठेवा की, केळी आणि कलिंगड नेहमी ताजे असावे.
कलिंगडमध्ये अँटिऑक्सिडेंट्स, जीवनसत्त्वे बी, सी आणि डी मोठ्या प्रमाणात आढळतात. जे आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. म्हणून उन्हाळ्यात कलिंगड खाण्याचा सल्ला डाॅक्टर देतात. कलिंगडमध्ये लोह, झिंक, फायबर आणि प्रोटीनसोबत मायक्रोन्यूट्रियंटस असतात. 4 ग्रॅम कलिंगडमध्ये फक्त 23 कॅलरीज असतात. शक्यतो कलिंगड खाल्ल्यानंतर कलिंगडाचे साल आपल्या चेहऱ्यावर चोळले पाहिजेत.
केळीमध्ये पोटॅशियम, मूड-रेगुलेटिंग फोलेट, ट्रायटोफन आणि एनर्जाइजिंग कार्ब्स देखील असतात. केळी पोटॅशियमने समृद्ध आहेत. केळी आपल्या शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण करतात आणि शरीराला हायड्रेटेड ठेवण्यास मदत करते. केळीमध्ये 100 कॅलरी उर्जा असते, ज्यामुळे तुमचे शरीर दिवसभर सफुर्तीवान राहते. केळी हे फळ आपल्या त्वचेसाठी देखील अत्यंत फायदेशीर असते. केळी खाल्ल्यानंतर केळीचे साल आपल्या चेहऱ्यावर चोळण्याचे अनेक फायदे आहेत.
संबंधित बातम्या :
Weight Loss | ‘वेट लॉस जर्नी’दरम्यान वारंवार वजन तपासताय? मग ‘या’ गोष्टी आधी जाणून घ्या!
चपाती खाल्यानंतर ‘ही’ चूक अजिबात करु नका, आरोग्यास होऊ शकतं नुकसानhttps://t.co/YhmdUa5Ut6 #HealthTips | #Health | #Lifestyle | #Tv9Marathi
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 31, 2020
(Face pack of banana and watermelon is beneficial for the skin)