AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health : त्वचा आणि केसांसाठी खूप फायदेशीर आहे ग्रेप सीड ऑईल, असा करा वापर

ग्रेप सीड ऑईल म्हणजेच द्राक्षांच्या बियांचे तेल हे केवळ त्वचा आणि केसांसाठीच फायदेशीर नाही. त्याशिवाय या तेलाचे अनेक फायदे आहेत.

Health : त्वचा आणि केसांसाठी खूप फायदेशीर आहे ग्रेप सीड ऑईल, असा करा वापर
केसांची काळजी कशी घ्याल ?Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Sep 08, 2022 | 5:45 PM

बऱ्याच वेळेस अनेक लोकांना त्वचेचे प्रॉब्लेम्स आणि केस गळण्याची (Skin and Hair Problems) समस्या सतावत असते. काही लोकांना हा त्रास समजण्यास खूप उशीर होतो. मात्र या दोन्ही समस्यांवर एक चांगला उपाय आहे, ते म्हणजे ग्रेप सीड ऑईल. ग्रेप सीड ऑईल (Grape seed oil) म्हणजेच द्राक्षांच्या बियांचे तेल हे केवळ त्वचा आणि केसांसाठीच फायदेशीर (Benefits) नाही. त्याशिवाय या तेलाचे अनेक फायदे आहेत. विशेष म्हणजे वाईन तयार करताना द्राक्षाच्या बियांचे तेल मिळते. त्यामध्ये व्हिटॅमिन ई (Vitamin E) सह ओमेगा सीड फॅटी ॲसिडही असते. असे म्हटले जाते की, केसगळतीची समस्या रोखायची असेल तर ओमेगाचे सेवन करणे खूप महत्वाचे असते. ग्रेप सीड ऑईलचे आणखी काय काय फायदे आहेत ते जाणून घेऊया.

केसांची मुळं होतात मजबूत-

ग्रेप सीड ऑईलमध्ये ॲंटी-इन्फ्लेमेटरी आणि ॲंटी-मायक्रोबिअल तत्वं असतात, ज्यामुळे आपल्या केसांची मुळं मजबूत होण्यास मदत मिळते. हे तेल डीप कंडीशनरचे काम करते. एवढेच नव्हे तर, ग्रेप सीड ऑईलमुळे आपली स्कॅल्पही मॉयश्चराईज करते, ज्यामुळे कोंड्याची समस्या दूर होते व सेल्युलर डॅमेज होत नाही. ग्रेप सीड ऑईलचे अनेक फायदे आहेत. त्याचा अनेक प्रकारे उपयोग करता येतो. जर तुम्हाला कोरड्या केसांची समस्या असेल तर तुम्ही ग्रेप सीड ऑईल उत्कृष्ट हलके मॉयश्चरायझर म्हणून वापरू शकता.

त्वचेसाठी फायदेशीर –

ग्रेप सीड ऑईलमुळे आपली त्वचा चमकदार होण्यास मदत होते. हे तेल मॉयश्चरायझिंग मास्क म्हणून देखील वापरले जाते. लोबान किंवा लॅव्हेंडर सारख्या तेलात मिसळून मास्क तयार करता येतो. हे तेल हातावर घासून चेहऱ्यावर लावता येऊ शकते.

हे सुद्धा वाचा

ग्रेप सीड ऑईलचे अन्य फायदे –

ग्रेप सीड ऑईल तुम्ही सीरम प्रमाणे वापरू शकता. ते चेहऱ्यावर लावू शकता. तसेच तुम्ही ग्रेप सीड ऑईल एखाद्या लोशनमध्ये मिसळूनही त्वचेसाठी त्याचा वापर ककरू शकता. त्याशिवाय, जेवण बनवण्यासाठीही ग्रेप सीड ऑईलचा वापर करता येतो. या तेलाचे नियमित सेवन केल्याने शरीराला अनेक लाभ मिळतात. एकूणच ग्रेप सीड ऑईल हे केस, त्वचा आणि आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे

पहलगाम हल्ल्यात केंद्रीय सरकारने मान्य केली चूक
पहलगाम हल्ल्यात केंद्रीय सरकारने मान्य केली चूक.
पाणी रोखल्यानं पाकची तडफड का? सिंधू पाणी करार स्थगित, नेमकं काय होणार?
पाणी रोखल्यानं पाकची तडफड का? सिंधू पाणी करार स्थगित, नेमकं काय होणार?.
काश्मीरातून रुपाली ठोंबरे पुण्यात,अंधारेंनी मारली मिठी अन् अश्रू अनावर
काश्मीरातून रुपाली ठोंबरे पुण्यात,अंधारेंनी मारली मिठी अन् अश्रू अनावर.
भारताकडून पाकची कोंडी, तब्बल 20 देशांना..आता पाकिस्तान 'चेकमेट' होणार?
भारताकडून पाकची कोंडी, तब्बल 20 देशांना..आता पाकिस्तान 'चेकमेट' होणार?.
पाकसोबतचा सिंधू पाणी करार स्थगित, मोदींचा पाकवर 'कायदेशीर स्ट्राईक'
पाकसोबतचा सिंधू पाणी करार स्थगित, मोदींचा पाकवर 'कायदेशीर स्ट्राईक'.
पहलगाम हल्ल्यानंतर देश हळहळला, आता BSF जवान पाकिस्तानात गेला, घडल काय?
पहलगाम हल्ल्यानंतर देश हळहळला, आता BSF जवान पाकिस्तानात गेला, घडल काय?.
पाकच्या उलट्या बोंबा... भारताविरोधात पाकिस्तानं घेतले 'हे' मोठे निर्णय
पाकच्या उलट्या बोंबा... भारताविरोधात पाकिस्तानं घेतले 'हे' मोठे निर्णय.
तर रक्ताचे पाट वाहतील, भारताच्या निर्णयानंतर सईदचा तो व्हिडिओ व्हायरल
तर रक्ताचे पाट वाहतील, भारताच्या निर्णयानंतर सईदचा तो व्हिडिओ व्हायरल.
'जे कधीही विमानात बसले नाही, त्यांना..' नरेश म्हस्केंचं वादग्रस्त वधान
'जे कधीही विमानात बसले नाही, त्यांना..' नरेश म्हस्केंचं वादग्रस्त वधान.
दिल्लीच्या पाकिस्तानी उच्चायुक्तालयात केक? पहलगाम हल्ल्याचं दुःख नाही?
दिल्लीच्या पाकिस्तानी उच्चायुक्तालयात केक? पहलगाम हल्ल्याचं दुःख नाही?.