प्री-वेडिंग शूटसाठी ‘आउटफिट’च्या शोधात आहात? हे नक्की ट्राय करा..

कपल्स्‌ना आपल्या आवडी निवडीनुसार प्री-वेडिंग शूट करायला आवडते. या शूट दरम्यान आपण कोणत्या प्रकारचे ‘आउटफिट’ घालावेत याबाबत अनेक खल केले जातात. परंतु आपल्याला ‘कम्फर्ट’ असलेलेच कपडे नेहमी घालणे योग्य असते.

प्री-वेडिंग शूटसाठी ‘आउटफिट’च्या शोधात आहात? हे नक्की ट्राय करा..
प्री-वेडिंग शूट
Follow us
| Updated on: Feb 09, 2022 | 12:42 PM

गेल्या काही वर्षांपासून लग्नाआधी प्री-वेडिंग (Pre Wedding) फोटोशूटस्‌कडे (photoShoot) जोडप्यांसह त्यांच्या कुटुंबीयांचाही कल वाढलेला दिसून येत आहे. लग्नाआधीच्या आपल्या सुवर्णक्षणांना कायम लक्षात ठेवण्यासाठी तसेच आपल्या आठवणींना चिरतरुण ठेवण्यासाठी अनेक जण प्री-वेडिंग फोटोशूटचे माध्यम निवडत असतात. लग्नाआधीचे (wedding) प्री-वेडिंग फोटोशूट हे खास आठवणी जपण्याचा उत्तम मार्ग आहे. प्री-वेडिंग फोटोशूटसाठी अनेकदा ‘स्टायलिश’ किंवा पारंपारिक पेहराव असलेलाही पोषाख निवडला जात असतो. संबंधित कपल्स्‌च्या आवडीनुसार कपड्यांची निवड होत असते. प्री-वेडिंग शूट्स आज खूप सामान्य बाब झाली आहे. प्री-वेडिंग शूट आउटफिटमुळे (Outfits) जोडीदारासोबत खास आठवणी जपायला मदत होते. परंतु अनेदा शूट दरम्यान आपण कोणत्या प्रकारचे आउटफिट घालावेत याची चिंता अनेक वेळा महिलांना असते. याच बाबत आज या लेखातून काही पर्याय सूचवणार आहोत.

सलवार कुर्ता

प्री-वेडिंग शूटसाठी स्टायलिश सलवार सूट हा उत्तम मार्ग आहे. यामुळे आपले व्यक्तिमत्व अधिक उठून दिसते. प्री-वेडिंग शूट दरम्यानचे तुमचे फोटोही अधिक चांगल्या प्रकारे शूट होउ शकतील. शूटदरम्यान तुम्ही स्वत:ला अधिक कम्फर्ट अनुभवता.

अनारकली ड्रेस

अनारकली सूट सध्या अनेक ठिकाणी प्री-वेडिंग शूटसाठी आवर्जून वापरला जाणारा आउटफिट आहे. विविध प्रकारे शुटींग करण्यासाठी अनारकली ड्रेस उत्तम समजला जातो. फक्त उंची कमी असल्यास, अनारकली ड्रेसवर शूट करणे टाळावे, अनारकली ड्रेस हा लांब असल्याने कमी उंची असलेला व्यक्ती त्यात अजूनच लहान दिसू शकतो.

साडी

शूटसाठी कोणत्या प्रकारची साडी सर्वोत्तम असेल याबद्दल फोटोग्राफी टीमसह आपल्या जोडीदाराशी चर्चा करावी. साडी तुमच्या अंगावर चपखल बसली पाहिजे. कलर कोऑर्डिनेटेड आउटफिट्ससाठी उत्तम असले पाहिजे. आवडीनुसार आणि शूटच्या थीमनुसार तुम्ही स्मार्ट कॅज्युअल, पारंपारिक पोशाख घालू शकता. रिप्ड डेनिम किंवा शॉर्ट्ससह पांढरा टी-शर्ट एकत्र करून तुम्ही कॅज्युअलचा विचार करु शकता.

फॉर्मल लूक

फॉर्मल लूकसाठी काळा ड्रेस आणि इव्हनिंग गाऊन इत्यादी परिधान करू शकता. यासाठी लाल, काळा किंवा तपकिरी इत्यादी गडद रंग निवडू शकता. अनेक वेळा फॉर्मल लूकसाठी फिकट रंग हा प्रभावी ठरत नाही. शूटसाठी गडद रंग अत्यंत उठून दिसत असल्याने आपल्या रंगानुसार ड्रेसअपची निवड करावी

संबंधित बातम्या : 

Sharvari Wagh Photos : अभिनेत्री शर्वरी वाघचं समुद्रकिनारी नवं बिकिनी फोटोशूट, चाहते म्हणाले…

Urvashi Rautela | अभिनेत्रीच्या लूकनं चाहते घायाळ; उर्वशी रौतेलाच्या ड्रेसची जाणून घ्या किंमत!

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.