मानसिकदृष्ट्या मजबूत होण्यासाठी काय करावे? जाणून घ्या ‘या’ टिप्स
तुम्हाला माहिती आहे का की, तुम्ही शारीरिक आणि मानसिक, अशी दोन्ही बाजूने मजबूत असणं खूप गरजेचं आहे. तरच तुम्ही कोणताही महत्त्वाचा निर्णय नीट घेऊ शकता. आज स्पर्धेच्या युगात लहान वयातही ताण तणाव दिसून येतो. मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी आपण काही सोप्या टिप्स पाहुया.
मनाला आरामात श्वास घेऊ द्या, असं म्हटलं तर तुम्हाला थोडं वेगळं वाटेल. त्यासाठी ही बातमी संपूर्ण वाचा. मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असणे वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनासाठी वाईट आहे. जेव्हा तुम्ही मानसिकरित्या अस्वस्थ असता तेव्हा त्याचा शारीरिक आरोग्यावरही परिणाम होतो. ज्यामुळे वजन कमी होणे, भूक न लागणे, पोटदुखी, नेहमी थकवा जाणवणे, डोकेदुखी अशा समस्या उद्भवतात.
धावपळीत आपल्या शरीराला विश्रांती देण्याची जेवढी गरज आहे, तितकीच आपल्या मनाला आरामात श्वास घेऊ देणंही तितकंच गरजेचं आहे. ताणतणावाचा सामना करण्यासाठी आणि मानसिकदृष्ट्या निरोगी आणि मजबूत होण्यासाठी काही सोप्या टिप्सचा वापर केला जाऊ शकतो.
घरातील कामाचा ताण आणि जबाबदाऱ्या प्रत्येकाला पार पाडाव्या लागतात, पण या सगळ्यात स्वत:कडे दुर्लक्ष करू नये. शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहणे असो किंवा मानसिक आरोग्य राखणे असो, काही छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवल्यास तुम्ही मानसिकदृष्ट्या मजबूत व्हाल, तसेच शारीरिक आरोग्य आणि तंदुरुस्तीही चांगली राहील.
मानसिकदृष्ट्या मजबूत होण्यासाठी काय करावे?
बहुतेक लोक ताण तणावाला अतिशय हलकेपणाने घेतात आणि असे वाटते की ते कामाच्या मध्ये हा तणाव येत आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, कारण हळूहळू तणावाचे रूपांतर नैराश्य, चिंता आणि एकाकीपणात केव्हा होऊ लागते हेही कळत नाही. याचा आपल्या आरोग्यावर कधी परिणाम होऊ लागतो? चला तर मग जाणून घेऊया तुम्ही स्वत:ला मानसिकदृष्ट्या फिट आणि निरोगी कसे ठेवू शकता.
संगीत ऐका
संगीत थेरपी देखील उत्तम आहे. तुम्ही तणावग्रस्त असाल किंवा नकारात्मक विचार करत असाल तर तुम्ही आवडते किंवा तणावमुक्त संगीत ऐका.
मेडिटेशनचा सराव करा
मानसिकदृष्ट्या मजबूत आणि निरोगी राहण्यासाठी मेडिटेशनचा सराव करणे हा एक चांगला मार्ग आहे. त्यामुळे दररोज किमान 20 मिनिटे मेडिटेशन करावे.
श्वासोच्छवासाचा व्यायाम
ताणतणाव, चिंता कमी करण्यासाठी श्वासोच्छवासाचे व्यायाम अतिशय प्रभावी ठरतात. राग किंवा तणावादरम्यान दीर्घ श्वास घेणे फायदेशीर ठरते, याशिवाय श्वासोच्छवासाचे व्यायामही करू शकता.
निसर्गाच्या सान्निध्यात चालणे
ताणतणाव आणि त्रासांपासून स्वत:ला काही काळ दूर ठेवण्याचा उत्तम मार्ग म्हणजे निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवणे. रोज काही ही न बोलता, कुठलंही संगीत न ऐकता निसर्गाच्या मध्यभागी काही वेळ एकटं फिरतं.
रोज योगा करणे
रोज योगा केल्याने तुम्ही शारीरिकदृष्ट्या निरोगी आणि तंदुरुस्त तर होताच, शिवाय मानसिक आरोग्यही सुधारते आणि तणावही दूर होतो.
(डिस्क्लेमर: या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)