तणाव कमी करण्यापासून ते अनेक रोगांवर रामबाण उपाय म्हणजे ‘जवस’, वाचा !
जवसाच्या बियांना सुपरफूड म्हणून ओळखले जाते. यामध्ये केवळ पुष्कळ पोषक घटकच नसतात
मुंबई : जवसाच्या बियांना सुपरफूड म्हणून ओळखल्या जातात. यामध्ये केवळ पुष्कळ पोषक घटकच नसतात, तर निरोगी आरोग्यासाठी आवश्यक असणारे चांगले घटक देखील असतात. जवसमध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिडस्, फायबर, प्रथिने, व्हिटॅमिन बी 6, मॅग्नेशियम, कॅल्शियम तसेच अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म असतात. जे आपल्या निरोगी आयुष्यासाठी खूप महत्वाचे असतात. (Flaxseed is beneficial for reducing stress)
विशेष म्हणजे तणाव काळात जवस खाल्ल्याने तणाव कमी होण्यास मदत होते. असे हायपरटेन्शन जर्नलमध्ये प्रकाशित केलेल्या संशोधनानुसार समोर आले आहे. यामुळे सध्याच्या कोरोनाच्या काळामध्ये जवस खाणे फायदेशीर आहे. जवस कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. अभ्यासानुसार, दररोज जवस खाल्यास कोलेस्ट्रॉलची पातळी 6 ते 11 टक्क्यांनी कमी होऊ शकते. हे यामुळे शक्य आहे, कारण त्यात उच्च फायबर आणि लिग्निन घटक आहे.
जवस खाल्ल्याने नैसर्गिक पद्धतीने रक्तदाब कमी होतो. 2015च्या अभ्यासानुसार, ज्यांनी 12 आठवड्यांपर्यंत दररोज जवस खाल्ले होते, त्यांचा रक्तदाब नियंत्रणाखाली होता. या बियांमध्ये मुबलक प्रमाणात पोटॅशियम असते. हे घटक रक्तवाहिनीच्या भिंतीवरील ताण कमी करण्यात मदत करतात आणि रक्तदाब नियंत्रित ठेवतात. जवसामध्ये इतर नट्सपेक्षा केवळ कॅलरी जास्त नसतात, तर त्यामध्ये बरेच पौष्टिक घटक देखील असतात. 100 ग्रॅम जलसामध्ये जवळपास 534 कॅलरी असतात.
अर्थात एक चमचा जवसमध्ये 55 कॅलरी असतात. म्हणून जवस वजन कमी करण्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. या लहान बियामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. जे आपली भूक देखील भागवते आणि आरोग्यास निरोगी ठेवण्याचे काम करते. एका अभ्यासानुसार असे म्हटले गेले आहे की, हे वजन कमी करण्यात जवस मदत करते. जवस खाल्ल्याने पचन क्रिया किंवा पित्त कमी करण्यासाठी मदत होते.
दातासाठी जवस फार गुणकारी आहे. हिरड्या मजबूत होण्यासाठी आणि दात दुखत असेल तर जवसचं तेल फायदेशीर ठरते. पाठ दुखीवर जवस खूप गुणकारी आहे. पाठ दुखत असेल त्याठिकाणी जवस कपड्यात बांधून ठेवावे. त्यामुळे नसा मोकळ्या होण्यास मदत होते आणि तुमची पाठ दुखी दूर होईल. जवसाचं पीठ घेऊन त्याने छाती शेकली तर कफ पातळ होऊन तो बाहेर पडण्यास मदत होते. यामुळे तापाचे प्रमाण देखील कमी होईल.
(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा अथवा सौंदर्य तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
संबंधित बातम्या :
Skin Care | चेहऱ्यावर चुकूनही लावू नका ‘या’ गोष्टी, अन्यथा होऊ शकते त्वचेचे नुकसान!
Dieting Side Effects | डाएटिंग करताय? ‘ही’ लक्षणे दिसताच त्वरित थांबणे ठरेल फायदेशीर!
Skin Care | थंडीमुळे कोरड्या पडलेल्या चेहऱ्याला मॉश्चराइझ करायचंय? वापरा घरगुती ‘स्ट्रॉबेरी फेस पॅक’!#strawberry | #skincare | #skincareroutine | #skincaretips https://t.co/K0gUjPPFHn
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 12, 2021
(Flax is beneficial for reducing stress)