Weight loss : वजन कमी करायचंय?, मग जवस खा; जाणून घ्या संपूर्ण माहिती

जवस खाणे आपल्या निरोगी आयुष्यासाठी खूप फायदेशीर आहे. दररोज जवसाचा आहारात समावेश केला तर आरोग्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते.

Weight loss : वजन कमी करायचंय?, मग जवस खा; जाणून घ्या संपूर्ण माहिती
जवस
Follow us
| Updated on: May 30, 2021 | 11:35 AM

मुंबई : जवस खाणे आपल्या निरोगी आयुष्यासाठी खूप फायदेशीर आहे. दररोज जवसाचा आहारात समावेश केला तर आरोग्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. त्यात बरेच पौष्टिक पदार्थ असतात. जवसमध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिडस्, फायबर, प्रथिने, व्हिटॅमिन बी 6, मॅग्नेशियम, कॅल्शियम तसेच अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म असतात. फायबर हृदयरोग आणि टाइप -2 मधुमेह रूग्णांसाठी फायदेशीर आहे. म्हणून ज्यांना हृदयरोग आणि टाइप -2 मधुमेह आहे, त्यांनी आहारात जवसचा समावेश करा. (Flaxseed is beneficial for weight loss)

याशिवाय जवस वजन कमी करण्यासाठी खूप प्रभावी आहे. ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांनी आहारात जवस जास्तीत-जास्त घ्यावे. जवसामुळे आपला चयापचय दर वाढतो आणि वजन कमी करण्यास मदत होते. वजन कमी करण्यासाठी, दररोज पुरेसे प्रथिने खाणे महत्वाचे आहे. यामुळे जवस खाल्ले पाहिजे. 100 ग्रॅम जवसामध्ये 18 ग्रॅम प्रथिने असतात. त्यामध्ये असलेले प्रथिने स्नायू बनवण्याबरोबरच शरीराच्या पेशी दुरुस्त करण्याचे काम करतात.

जवसमध्ये भरपूर फायबर असते जे आपली भूक नियंत्रित करण्यात मदत करते. एका अभ्यासानुसार, रोज एक चमचे जवस खाल्ल्यास वजन कमी होते. यात ओमेगा -3 फॅटी अॅसिड असतात. जे हृदय मजबूत ठेवण्यास मदत करतात. जर एखाद्याला उच्च रक्तदाब समस्या असेल तर, दररोज जवस खाल्यास रक्तदाब कमी होतो. काही अभ्यासांमध्ये असा दावा केला आहे की, जवस खाल्ल्याने कर्करोगाचा धोका कमी होतो आणि शरीराची जळजळ कमी होण्यास मदत होते.

एक चमचा जवस, एक चमचा लिंबाचा रस, एक चमचा गूळ घ्या. कढईत एक चमचा जवस एक ग्लास पाण्यात उकळायला ठेवा. दहा मिनिटांनी गॅस बंद करा आणि चव वाढवण्यासाठी त्यामध्ये एक चमचा लिंबाचा रस आणि गूळ मिक्स करा. हे थोडा वेळ थंड होऊ द्या आणि प्या. हे खास पेय आपण शक्यतो रिकाम्या पोटी घेतले पाहिजे. यामुळे आपले वजन झटपट कमी होते. दातासाठी जवस फार गुणकारी आहे. हिरड्या मजबूत होण्यासाठी आणि दात दुखत असेल तर जवसचं तेल फायदेशीर ठरते. पाठ दुखीवर जवस खूप गुणकारी आहे.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Dieting Side Effects | डाएटिंग करताय? ‘ही’ लक्षणे दिसताच त्वरित थांबणे ठरेल फायदेशीर!

Skin Care | चेहऱ्यावर चुकूनही लावू नका ‘या’ गोष्टी, अन्यथा होऊ शकते त्वचेचे नुकसान!

(Flaxseed is beneficial for weight loss)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.