केसांच्या मुळांना हानी पोहोचवणाऱ्या ‘या’ 3 चुका, तुम्हीही करताय का?
प्रत्येक ऋतूमध्ये केसांची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. केसांची काळजी नाही घेतली तर केस कोरडी आणि निर्जीव होतात.
मुंबई : प्रत्येक ऋतूमध्ये केसांची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. केसांची काळजी नाही घेतली तर केस कोरडी आणि निर्जीव होतात. त्यामुळे केसं तुटू लागतात आणि केसांची चमकही कमी होते. म्हणून केसांची विशेष काळजी घ्यावी लागते. किमान तीन दिवसांमध्ये एकदा तरी केस धुणे आवश्यक आहे. मात्र, केस धुताना देखीस विशेष काळजी घेणे आवश्यक असते. (Follow these hair washing tips)
-आपल्या सर्वांना गरम पाण्याने केस धुण्याची सवय असते. गरम पाण्याने केस धुतल्यामुळे केसांमधून नैसर्गिक चमक जाण्याची शक्यता असते. गरम पाण्याने केस धुतल्याने आपल्याला काही काळ बरे देखील वाटेल. मात्र, आपल्या केसांच्या आरोग्यासाठी गरम पाण्याने केस धुणे योग्य नाही. थंड पाण्याने किंवा कोमट पाण्याने केस धुणे हे सर्वात सुरक्षित आहे.
-आपल्या केसांना योग्य पोषण मिळण्यासाठी आणि ते चमकदार होण्यासाठी, केस धुतल्यानंतर कंडीशनिंग करणे महत्वाचे आहे. मात्र, या कंडिशनर्समध्ये रसायने खूप जास्त प्रमाणात असता. आपल्या केसांच्या आरोग्यासाठी ती खूप घातक सिद्ध होतात. ही रसायने आपल्या केसांना रुक्ष आणि निर्जीव बनवतात. म्हणून जर तुम्ही केस धुतल्यानंतर कंडिशनर्स वापरत असाल तर त्याचे प्रमाण कमी असले पाहिजे. शक्यतो केसांना कंडिशनर्स न वापरलेले कधी पण चांगलेच
-केस धुतल्यानंतर लगेचच विंचरू नका कारण आपण तसे केले तर केस गळण्याची आणि तुटण्याची शक्यता अधिक असते. केस नैसर्गिक रित्या वाळू द्या किंवा उन्हाळात बसा त्यानंतर केस विंचरले तरी चालतील.
-कोरफड आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध आहे. हे केवळ आपल्या त्वचेची काळजी घेत नाही, तर आपल्या केसांसाठीही फायदेशीर ठरतात. यामुळे आपले केस चमकदार होतात. कोरफडयुक्त हेअर कंडिशनर बनवण्यासाठी, प्रथम कोरफडच्या पानांतून गर काढा. आता एक चमचे लिंबाचा रस, 4 चमचे कोरफड जेलमध्ये घाला. आता हे मिश्रण आपल्या केसांवर लावा आणि सुमारे 10 मिनिटे आपल्या केसांवर तसेच राहू द्या. 10 मिनिटांनंतर कोमट पाण्याने आपले केस स्वच्छ करा
संबंधित बातम्या :
Health | केस विरळ होण्याची समस्या, काळजी घेण्याऐवजी तुम्हीही ‘या’ चुका करताय?
Skin Care | सकस अन्न खा, भरपूर पाणी प्या, हिवाळ्यात त्वचेचे सौंदर्य जपा!
Health | मनुष्य जीवनाशी निगडीत ‘या’ गोष्टी जाणून घ्या आणि तणावमुक्त, सकारात्मक आयुष्य जगा!https://t.co/eNdbD2CG42#healthcaretips
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 17, 2020
(Follow these hair washing tips)