Beauty Tips : कलरफुल आयलाइनर वापरताना ‘या’ टिप्स नक्की फाॅलो करा !
आजकाल मेकअपचा ट्रेंड बदलत चालेला आहे. त्यामध्येही आय मेकअपवर बहुतेक स्त्रियांचा जास्त भर असतो.
मुंबई : आजकाल मेकअपचा ट्रेंड बदलत चालेला आहे. त्यामध्येही आय मेकअपवर बहुतेक स्त्रियांचा भर असतो. डोळ्यांचा डार्क मेकअप केला जातो. त्यासाठी रंगीबेरंगी आयलाइनरचा वापर केला जातो. विशेषतः लग्न समारंभात मुलींना डोळ्यांना स्मोकी लुक द्यायला आवडते. हा आय मेकअप तुम्हाला स्टायलिश आणि ग्लॅमरस लूक देतो. (Follow these special tips when using Colorful Eyeliner)
आज बाजारात स्मूज प्रूफ, वॉटर प्रूफ, लिक्विड आणि जेल आयलाइनर यासह अनेक उत्पादने उपलब्ध आहेत. अशा परिस्थितीत, मुलींसाठी कोणते आयलाइनर योग्य असेल हे निवडणे थोडे अवघड आहे. यासह, रंगीबेरंगी आयलाइनर वापरताना काही गोष्टी लक्षात ठेवणे फार महत्वाचे आहे, अन्यथा आपला मेकअप खराब होऊ शकतो. चला या टिप्सबद्दल जाणून घेऊया.
-लिक्विड आईलाइनर सहजपणे डोळ्यांच्या पापण्याला लागू शकतो. हे आपल्या डोळ्यांसाठी देखील फायदेशीर आहे. जर आपल्याला आयलाइनर लावण्याची सवय नसेल तर लिक्विड लाइनर हा एक उत्तम पर्याय आहे. तथापि, जेल आयलाइनर देखील बाजारात उपलब्ध आहेत. जर आपल्याला आयलाइनर लावण्याची सवय नसेल तर लिक्विड आयलाइनर लावण्यासाठी थोडे अवघड जाऊ शकते.
-बहुतेक स्त्रिया काळ्या आयलाइनरशिवाय दुसऱ्या रंगाचे आईलाइनर निवडत नाहीत. आपण आपला लुक बदलू इच्छित असल्यास कधी-कधी इतरही रंगाचे आयलाइनर वापरून बघितले पाहिजे. यामुळे आपल्या चेहऱ्याला नवीन लूक देखील येईल.आयलाइनर वापरताना, हे लक्षात ठेवावे की लाईन अप करण्यासाठी नेहमी लेसर वापरा. यानंतर, आपण आपल्या गरजेनुसार ते 2 ते 3 वेळा कोट करू शकता.
-आजकाल, सर्व प्रकारचे रंगीबेरंगी आयलाइनर बाजारात उपलब्ध आहेत, जे आपण वेगवेगळ्या प्रकारे लागू करू शकतो. आपल्या त्वचेच्या टोननुसार आयलाइनर निवडा. टोननुसार आयलाइनर निवडले तर ते आपल्या चेहऱ्यावर उठून दिसते. आपले डोळे खूप संवेदनशील असतात. यामुळे शक्यतो कापसाने किंवा मेकअप रीमूव्हरचा वापर करून आपण डोळयांवरचा मेकअप काढू शकतो.
-डोळ्यांवरील मेकअप काढण्यासाठी आपण तेलाचा उपयोग देखील करू शकता. डोळ्यांचा मेकअप काढून टाकण्यासाठी तुम्ही नारळ तेल, ऑलिव्ह ऑईल वापरू शकता. हे तेल आपल्या त्वचेसाठी फायदेशीर आहे. आपण ते सर्व प्रकारच्या त्वचेसाठी वापरू शकता.
-बरेच लोक मेकअप आणि लिपस्टिक काढण्यासाठी व्हॅसलीनचा वापर करतात. पण हे शक्यतो करणे टाळा कारण यामुळे आपली त्वचा तेलकट होऊ शकते आणि आपल्या चेहऱ्यावर मुरूम देखील येऊ शकतो. डोळ्यांचा मेकअप काढण्यासाठी व्हॅसलीनचा वापर करू नका.
संबंधित बातम्या :
Food | ‘या’ पदार्थांना दूर ठेवा आणि हिवाळ्याच्या काळात सर्दी-खोकल्यापासून सुरक्षित राहा!
Weight Loss | वजन वाढवण्यासाठीच नव्हे तर, वजन कमी करण्यासाठीही ‘केळी’ फायदेशीर!#weightloss | #weightlossdiet | #Banana | #food https://t.co/Qrrqlm9y5A
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 19, 2021
(Follow these special tips when using Colorful Eyeliner)