त्वचा तजेलदार आणि सुंदर पाहिजे? मग ‘या’ टिप्स नक्की फाॅलो करा
उन्हाळ्यामध्ये त्वचेची विशेष काळजी घेण आवश्यक आहे. उन्हाळ्यात स्वतःला आणि त्वचेला हायड्रेटेड सर्वात महत्वाचे आहे.
मुंबई : उन्हाळ्यामध्ये त्वचेची विशेष काळजी घेण आवश्यक आहे. उन्हाळ्यात स्वतःला आणि त्वचेला हायड्रेटेड सर्वात महत्वाचे आहे. उन्हाळ्यात काकडी खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे कारण काकडीमध्ये बरेच पौष्टिक पदार्थ आढळतात. मात्र, तुम्हाला हे माहिती आहे का? की, काकडी खाणे ज्याप्रमाणे आपल्या शरीरासाठी चांगले आहे तसेच आपल्या त्वचेसाठी देखील काकडी फायदेशीर आहे. (Follow these tips for radiant skin)
काकडीमध्ये व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन सी आणि बीटा कॅरोटीन यासारख्या पोषक तत्त्वांचा समावेश आहे. तसंच काकडी आपल्या त्वचेसाठी नैसर्गिक क्लींझरप्रमाणे कार्य करते. यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते. अर्धी काकडी, दोन ते तीन पुदिन्याची पाने, ग्लिसरीन साबणची वडी तयार करण्यासाठी पेपर कप किंवा वाटी सर्वप्रथम काकडी पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या आणि मध्यातून कापा. आता काकडी मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्या.
काकडीची बारीक पेस्ट तयार करून घ्या. पुदिन्याची पाने देखील बारीक कापून घ्या. एका पॅनमध्ये डबल बॉयलर भांडे ठेवून साबण वितळवून घ्यावा. वितळवलेल्या साबणामध्ये काकडीची पेस्ट आणि पुदिन्याची बारीक कापलेली पाने मिक्स करा. गॅस बंद करा आणि साबणाचे मिश्रण थंड होण्यास ठेवून द्या. साबणाचे मिश्रण एका साच्यामध्ये भरा. यानंतर साचा एक किंवा दोन तासांसाठी फ्रीजरमध्ये ठेवून द्या. साबणाची वडी तयार झाल्यानंतर साच्यातून अलगद काढावी. घरगुती आयुर्वेदिक साबण तयार झाला आहे.
-उन्हाळ्यात तर काकडी जास्तीत जास्त खाल्ली पाहिजे. कारण काकडीमध्ये 80 टक्के पाणी आढळते, ज्यामुळे काकडी खाल्ल्याने आपल्या शरीरात पुरेसे पाणी मिळते. याशिवाय काकडीमध्येही जीवनसत्त्वे आढळतात. काकडीमध्ये भरपूर कॅलरी असतात काकडी खाल्लाने शरीरामध्ये चरबी निर्माण होत नाही. म्हणूनच काकडी खाल्ल्याने देखील नियंत्रणात राहते. दिवसातून एकदा तरी आपण काकडी खाल्ली पाहिजे.
Hair Fall | मधुमेहामुळे देखील उद्भवू शकते केस गळती, रक्तातील साखर नियंत्रित करणे आवश्यक!#HairFall | #diabetes | #Health | #HealthCarehttps://t.co/GBfureUNxN
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 27, 2021
(Follow these tips for radiant skin)