लठ्ठपणाने त्रस्त असणाऱ्या महिलांनो, गर्भावस्थेत वजन कमी करण्यासाठी ट्राय करा ‘या’ टिप्स!
गर्भधारणेदरम्यान वजन वाढणे सामान्य बाब आहे. गर्भाशयात बाळाचे जसे वजन वाढते तसे स्त्रीचे वजन देखील वाढते.
मुंबई : गर्भावस्थेतदरम्यान वजन वाढणे सामान्य बाब आहे. गर्भाशयात बाळाचे जसे वजन वाढते तसे स्त्रीचे वजन देखील वाढते. परंतु जर एखाद्या महिलेचे अगोदरच वजन जास्त असेल तर अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. अशा परिस्थितीत महिलेला मधुमेह आणि प्रीक्लेम्पसिया धोका देखील वाढतो. यामुळे गर्भपात देखील होऊ शकतो. महिला वजन कमी करुन असे धोके कमी करू शकतात. परंतु वजन कमी करण्याचा निर्णय डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच घ्यावा. अन्यथा अडचणही वाढू शकतात. (Follow these tips for Weight loss during pregnancy)
-जर तुम्हाला खरोखरच गर्भावस्थेत वजन कमी करायचा असेल तर भरपूर पाणी प्या. पाणी पिण्याने आपल्या शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. आपले शरीर डिहाइड्रेट राहते. पाण्याच्या जागी आपण लिंबाचे पाणी किंवा नारळ पाण्याचा पर्याय देखील घेऊ शकता. हे आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे आणि यामुळे वजन देखील वाढत नाही.
-आपल्या आहारामध्ये असा आहार समाविष्ट करा जो आपल्याला आवश्यक पोषक देईल आणि वजन वाढण्याचा धोका देखील राहणार नाही. यासाठी आपण जास्तीत जास्त सलाद खाल्ले पाहिजे त्यामध्ये काकडी, बीट, गाजर, टोमॅटोचा याशिवाय उपमा, पोहे, मोड फुडलेली धान्य आणि फळे खा. दिवसभर या सर्व गोष्टी खा जेणेकरून शरीराला ऊर्जा मिळेल.
-तळलेले आणि जास्त तूप खाणे टाळा. या व्यतिरिक्त जंकफूड, फास्टफूड किंवा साखर असलेले पदार्थ शक्यतो कमी प्रमाणात घेतले पाहिजेत.
-डॉक्टरांच्या सल्लानुसार व्यायाम, योग आणि प्राणायाम वगैरे करा. शक्य असल्यास सकाळ आणि संध्याकाळी फिरा. जर तुम्हाला कुढल्याही त्रास वगैरे होत नसेल तर घरातील थोडी कामे देखील करा.
-गर्भधारणेदरम्यान वजन कमी करण्याचा निर्णय स्वत: च घेऊ नका. त्यासाठी अगोदर डाॅक्टरांचा सल्ला घ्या.
संबंधित बातम्या :
Health | देशातील 10 टक्के महिला PCODने ग्रासित, जाणून घ्या ‘या’ आजाराबद्दल…https://t.co/j8mizk9UJ9#PCOD #health
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 17, 2020
(Follow these tips for Weight loss during pregnancy)