उन्हाळ्यामध्ये ‘या’ टिप्स फाॅलो करा, चेहऱ्यावर येईल ग्लो

हिवाळा संपत आला असून आता उन्हाळ्याची चाहूल लागली आहे.

उन्हाळ्यामध्ये 'या' टिप्स फाॅलो करा, चेहऱ्यावर येईल ग्लो
सुंदर त्वचा
Follow us
| Updated on: Mar 22, 2021 | 7:16 AM

मुंबई : हिवाळा संपत आला असून आता उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. उन्हाळ्यासाठी केवळ पोशाख बदलून चालणार नाही तर त्वचेची देखभालीकरिता दिनचऱ्या देखील बदलणे तितकेच गरजेचे आहे. हिवाळ्यातील त्वचेची देखभाल घेण्याची पध्दत आणि उन्हाळ्यातील त्वचेची देखभाल करण्याची पद्धत भिन्न आहे. वाढत्या तापमानाचा परिणाम त्वचेवर होत असून तेलकट टी झोन, पुरळ, मुरुम आणि ब्रेकआउट्सची शक्यता असते. (Follow these tips in summer, glow will come on your face)

त्वचा कोरडी होऊ न देता त्वचेच्या स्वच्छतेकडे लक्ष द्या. कोरफड, काकडी, चारकोल क्लीन्झरचा वापर करा. चांगल्या दर्जाच्या व्हिटॅमिन सी सेरमचा वापर करा जे आपल्या त्वचेला फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण देतात किंवा त्वचेला संतुलित ठेवण्यात नक्की मदत करतील तसेच आपण कॉफी सीरमची निवड देखील करू शकता. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत उन्हाळ्यात त्वचेची काळजी नेमकी कशी घ्यावी याबद्दल काही काही टिप्स…

-उन्हाळ्यात त्वचेला थंडावा देण्यासाठी आणि त्वचा काळवंडण्याची समस्या रोखण्यासाठी कच्च्या बटाट्याचे फेस पॅक खूप फायदेशीर आहे. हे फेस पॅक इतके प्रभावी आहे की आपण महागड्या क्रीमचा उपयोगही करणार नाही. आठवड्यातून केवळ एकदा हा उपाय करावा. दोन चमचे बटाट्याचा किस, एक चमचा चंदन पावडर, एक चमचा गुलाब पाणी. तिन्ही सामग्री एकत्र मिक्स करून फेस पॅक तयार करा. 30 ते 35 मिनिटे हे मिश्रण आपल्या चेहऱ्यावर लावा. हवे असल्यास आपण हे पॅक मान व खांद्यांवरही लावू शकता.

-जर आपल्याला चेहऱ्यावरील डाग काढून टाकायचे असतील, तर 1 चमचा चंदन पावडरमध्ये 2 चमचे दूध घालून पेस्ट बनवा. आता त्यात एक चमचा बदाम पावडर मिक्स करा. या तिन्ही घटकांना चांगले मिसळा आणि ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर लावा. कोरडी झाल्यानंतर चेहरा पाण्याने धुवा. यामुळे तुमची त्वचा चमकदार होईल व मुरुमांपासून मुक्तता मिळेल

-आपल्या चेहऱ्याला आणखी त्वचेला चमकदार बनवण्यासाठी आणि मुरुमांपासून कायमची मुक्तता मिळवण्यासाठी आपण 5 ग्रॅम चंदनमध्ये 2 ग्रॅम कापूर मिसळू शकता. आता त्यात एक चमचा गुलाब पाणी घाला आणि जाड पेस्ट बनवा. आता ही पेस्ट फेस पॅक प्रमाणे आपल्या चेहर्‍यावर लावा आणि 15 मिनिटे तशीच राहू द्या. पेस्ट पूर्णपणे कोरडी झाल्यानंतर, आपण आपला चेहरा साध्या पाण्याने धुवावा.

संबंधित बातम्या : 

(Follow these tips in summer, glow will come on your face)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.