कोरोना काळात रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवायची? जाणून घ्या त्रिसूत्री
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये आपण आपली रोगप्रतिकारक शक्ती टिकवणे खूप महत्वाचे झाले आहे.
मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये आपण आपली रोगप्रतिकारक शक्ती टिकवणे खूप महत्वाचे झाले आहे. यासाठी आपल्याला आहारासोबतच इतर अनेक गोष्टींवर लक्ष देणे आवश्यक आहे. त्यासाठी आपल्याला जीवनशैलीत थोडासा बदल करावा लागणार आहे. यामध्ये व्यवस्थित आहार, झोप आणि व्यायाम हे सर्वात महत्वाचे आहे आणि विशेष म्हणजे जास्तीत-जास्त आहारामध्ये फळांचा समावेश केला पाहिजे. (Follow these tips to boost the immune system during the corona period)
चांगली आणि पुरेशी झोप शरीरासाठी अतिशय आवश्यक आहे. आजकाल आपण दिनक्रमात आपण इतके व्यस्त होत चाललो आहोत की स्वतःला शांतीचे दोन क्षणसुद्धा आपण देऊ शकत नाही. मानवी शरीराला कमीत कमी 6 ते 8 तासांची झोप आवश्यक असते. पुरेशी झोप न मिळाल्याने थकवा जाणवणे तसेच एकाग्रता कमी होते. शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी झोप सर्वात महत्वाची आहे.
आपण नेहमीच ऐकत आलो आहोत की पाणी हे आपल्या निरोगी जीवनासाठी लाभदायक आहे. परंतु, केवळ पाणी द्रव पदार्थ म्हणून न पिता, आपण ‘डेटॉक्स वॉटर’ म्हणून देखील रोज नियमाने पिऊ शकतो. ‘डेटॉक्स वॉटर’ तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी किंवा दिवसभरात कधीही पिऊ शकता. ‘डेटॉक्स वॉटर’ तयार करण्यासाठी काकडीचे काप पाण्यात घालून ठेवा. या पाण्यात लिंबाचा रस आणि पुदीन्याची पाने मिसळा. थोड्याथोड्यावेळाने हे पाणी पीत रहा. यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
नियमित ठरवून चालले पाहिजे. चालताना मन दुसऱ्या कामांमध्ये न गुंतवता, अथवा इतर कुठल्याही विचारात गढून न राहता फक्त चालत राहिले पाहिजे. चालण्याच्या व्यायामामुळे फुप्फुसांची क्षमता वाढते, मनस्थिती सुधारते, प्रतिकारशक्ती वाढते, अन्न पचन करण्याच्या क्रियेत वाढ होते, मधुमेहाचा धोका कमी होतो, स्मरणशक्ती तल्लख होते, असे अनेक फायदे आहेत. म्हणूनच तंदुरुस्त आणि निरोगी शरीरासाठी चालण्याचा व्यायाम केलाच पाहिजे. रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी आपण सर्व प्रकारची फळे खाल्ली पाहिजेत.
आपल्या शरीराला विटामिन व्यवस्थित भेटतात. सोबतच आपण आहारात जास्तीत-जास्त हिवव्या भाज्यांचा समावेश केला पाहिजे. कलिंगड हे उन्हाळ्याचे फळ आहे जे फक्त खायलाच नाही तर आपल्या शरीरास हायड्रेटदेखील करते. उन्हाळ्यात उपलब्ध असलेले हे फळ आपल्या शरीराला केवळ आवश्यक पोषक आहार देत नाही तर पाण्याचे अभाव देखील पूर्ण करते. किवी फळ या दिवसांत प्रचंड लोकप्रिय झाले आहे आणि त्याला भारतातही जास्त मागणी आहे. आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल की, किवीमध्ये 173 मिलीग्राम व्हिटामिन सी असते, जो संत्र्यापेक्षा दुप्पट आहे.
संबंधित बातम्या :
Hair Care | थंडीच्या दिवसांत रुक्ष केसांच्या समस्येमुळे हैराण? मग ‘हे’ हेअर मास्क नक्की ट्राय करा!https://t.co/R06JFAcxU4#HairMask #HairCare #beautytips
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 29, 2020
(Follow these tips to boost the immune system during the corona period)