चेहऱ्यावर हवाय नॅचरल ग्लो, तर ‘या’ टिप्स फाॅलो करा
त्वचा निरोगी ठेवण्यासाठी आपण विविध उपाय ट्राय करतो. निरोगी आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी, विविध सौंदर्य उत्पादनांचा वापर करतात.
मुंबई : त्वचा निरोगी ठेवण्यासाठी आपण विविध उपाय ट्राय करतो. निरोगी आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी, विविध सौंदर्य उत्पादनांचा वापर करतो. परंतु, आपणास माहित आहे का की, या महागड्या उत्पादनांऐवजी काही चांगल्या सवयींचा अवलंब करून देखील आपण निरोगी त्वचा मिळवू शकता. या सवयींचा अवलंब केल्याने त्वचा सुधारण्यास सुरुवात होते. (Follow these tips to get a natural glow on your face)
-हळद अँटीबॅक्टेरीयल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. यामुळे त्वचा चमकदार होण्यास मदत होते. यातील पोषण तत्त्व कोलेजनचे उत्पादन वाढवतात, ज्यामुळे त्वचेवरील सुरकुत्या कमी होण्यास मदत मिळते. बेसनमध्ये अर्धा चमचा हळद पावडर मिक्स करा. दूध टाकून पेस्ट तयार करा जर तुमच्याकडे गुलाब जल असेल तर या पेस्टमध्ये गुलाब जल मिक्स करा. ही पेस्ट चेहरा आणि मानेवर लावा आणि चेहरा कोमट पाण्याने धुवून घ्या.
-मध आणि दूध दोन्हीही क्लींजिंग एजंट म्हणून काम करतात आणि मुरुमांना कारणीभूत बॅक्टेरीया कमी करण्यासाठी कार्य करतात. हे त्वचेत क्लिंजरसारखे कार्य करते. यासाठी आपल्याला एक चमचे दूधात 2 चमचे मध मिसळून पेस्ट तयार करावी लागेल. ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर 5 ते 10 मिनिटे लावून ठेवा आणि नंतर थंड पाण्याने धुवा. त्वचा निरोगी आणि चमकदार राहण्यासाठी टोनर आणि मॉइश्चरायझर वापरा.
-मुलतानी माती आणि गुलाबाच्या पाण्यात, ऑलिव्ह ऑईल मिसळून त्याची पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहऱ्यावर व्यवस्थित लावा. दीड तासानंतर कोमट पाण्याने आपला चेहरा धुवा. यामुळे त्वचेचा कोरडेपणा नाहीसा होईल. केळी आणि खोबरेल तेलाचा फेस पॅक तयार करण्यासाठी आपल्याला एका वाडग्यात केळी मॅश करावी लागतील. या केल्याच्या मिश्रणात एक चमचा खोबरेल तेल मिसळून चेहऱ्यावर लावा. कोरडा झाल्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा.
-थोडी मसूर डाळ शुद्ध तुपात भाजून घ्या. यानंतर, डाळ दुधात भिजवून घ्या आणि ही डाळ चांगली भिजल्यानंतर त्याची बारीक पेस्ट करून घ्या. ही पेस्ट किमान एक ते दीड तास चेहर्यावर लावा. चेहऱ्यावर फेस पॅक लावलेला असताना, कुणाशीही बोलू नका किंवा हावभाव करू नका. अन्यथा, त्वचा सैल होईल. सुकल्यानंतर चेहरा कोमट पाण्याने धुवा. आपण दररोज हा फेस पॅक वापरू शकत नसाल, तर दोन ते तीन दिवसांनी पुन्हा चेहऱ्यावर प्रयोग करा. हा फेस पॅक रेफ्रिजरेटरमध्ये ठेवून पुन्हा वापरू शकता.
संबंधित बातम्या :
Baking Soda Scrub | हिवाळ्यात त्वचा निस्तेज झाली आहे, तर बेकिंग सोडा स्क्रब नक्की ट्राय कराhttps://t.co/0InIgl3meK#WinterDrySkin #BakingSodaScrub
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 7, 2020
(Follow these tips to get a natural glow on your face)