Oily Skin care : उन्हाळ्यात चेहरा तेलकट होतोय?, मग ‘हे’ फेसपॅक नक्की ट्राय करा

उन्हाळ्याच्या हंगामात त्वचेची विशेष काळजी घेतली पाहिजे. उन्हाळ्यात अनेकांची त्वचा तेलकट होते.

Oily Skin care : उन्हाळ्यात चेहरा तेलकट होतोय?, मग 'हे' फेसपॅक नक्की ट्राय करा
सुंदर त्वचा
Follow us
| Updated on: May 21, 2021 | 1:24 PM

मुंबई : उन्हाळ्याच्या हंगामात त्वचेची विशेष काळजी घेतली पाहिजे. उन्हाळ्यात अनेकांची त्वचा तेलकट होते. तेलकट त्वचेमुळे चेहऱ्यावर मुरुम येतो. तेलकट त्वचेची समस्या दूर करण्यासाठी आपण घरी काही फेसपॅक तयार करू शकता. यामुळे मुरुमांची समस्या कमी होण्यास मदत होईल. हे फेसपॅक कसे तयार करायचे हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. (Follow these tips to get rid of facial oiliness)

ओट्स फेसपॅक अॅपल साइडर व्हिनेगर आणि ओट्सचे फेसपॅक आपण घरी तयार करू शकतो. हे तयार करण्यासाठी ओट्सचे पीठ आणि अॅपल साइडर व्हिनेगर मिक्स करावे. हे चांगले मिसळा आणि चेहऱ्यावर लावा. हा पॅक कोरडा होईपर्यंत चेहऱ्यावर ठेवा. त्यानंतर स्वच्छ थंड पाण्याने आपला चेहरा धुवा. यामुळे त्वचेला चमक येईल. हे फेसपॅक ब्लॅकहेड्स आणि व्हाइटहेड्स काढून टाकण्यास देखील मदत करते. यामुळे त्वचेची पीएच पातळी संतुलित राहते.

तांदळाच्या पीठाचा फेसपॅक सर्वांत अगोरद अर्धी वाटी तांदूळ घ्या आणि ते बारीक करून घ्या. त्यामध्ये ताजे दही घाला ही पेस्ट व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि चेहऱ्यावर 30 ते 40 मिनिटे तसेच ठेवा आणि हा पॅक सुकल्यानंतर चेहऱ्यावर हात फिरवा यामुळे तुमचे स्क्रब देखील होईल. यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवा याचा फायदा त्वचेला होईल. आपली त्वचा चमकदार होण्यास मदत होईल. आठवड्यातून साधारण तीन ते चार वेळा ही पेस्ट चेहऱ्याला लावा.

टोमॅटोचा फेसपॅक जर तुमची त्वचा तेलकट असेल तर काकडी आणि टोमॅटो पॅक तुमच्यासाठी उत्तम. यासाठी, आपल्याला एक टोमॅटो आणि दोन चमचे काकडीची पेस्ट, एक चमचे मध मिसळावे लागेल. ही पेस्ट 15-20 मिनिटे आपल्या चेहऱ्यावर ठेवा. यानंतर ते कोमट पाण्याने धुवा. 2 चमचे ओटच्या जाड भरड्या पिठामध्ये टोमॅटोचा पेस्ट 2 चमचे मिसळावी. यानंतर त्यात दही घालावे. हे लॅक्टिक अॅसिड, टॉक्झिन्स आणि छिद्र साफ करण्यास मदत करते. हे आपल्या चेहऱ्यावर लावा. हा पॅक चेहऱ्यावर 15 मिनिटे टेवा आणि नंतर चेहरा पाण्याने धुवा.

कोरफडचा फेसपॅक ‘बहुगुणी’ असणाऱ्या कोरफडीचा वापर बऱ्याचश्या सौंदर्यवर्धक उत्पादनांमध्ये देखील केला जातो. अगदी कुठल्याही ऋतूत कोरफडीचा वापर करता येतो. कोरफडाच्या पानांमध्ये ए, बी1, बी2, बी3, बी6, बी12, सी, ई आणि फॉलिक अॅसिड यांसारखी पोषक तत्व आढळतात. आरोग्याच्या दृष्टीने कोरफडाची पाने ही नैसर्गिकरित्या प्रभावशाली आयुर्वेदीक वनस्पती आहे. जर तुमची त्वचा तेलकट असेल तर दिवसातून दोनदा चेहऱ्यावर कोरफडीचा गर लावा. यामुळे तेलकट त्वचा होणार नाही.

ग्रीन टी-मुलतानी माती फेस पॅक

तेलकट त्वचेसाठी ग्रीन टी आणि मुलतानी मातीचा फेस पॅक अत्यंत फायदेशीर आहे. हा फेस पॅक बनवणे खूप सोपे आहे. यासाठी एक चमचा ग्रीन टीमध्ये, एक चमचा मुलतानी माती मिसळून पेस्ट बनवा आणि 15 ते 20 मिनिटांसाठी चेहऱ्यावर लावा. नंतर चेहरा पाण्याने धुवा.

(टीप : कुठल्याही कृतीपूर्वी डॉक्टरांचा किंवा सौंदर्यतज्ज्ञांचा सल्ला घेणे बंधनकारक आहे.)

संबंधित बातम्या : 

Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो

Papaya Seeds Benefit | तुम्ही पपईच्या बिया फेकून देताय…? तर थांबा अगोदर हे वाचा!

(Follow these tips to get rid of facial oiliness)

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.