पांढऱ्या केसांमुळे त्रस्त आहात?, थांबा ‘हे’ नैसर्गिक घटक वापरून पाहा!

वाढत्या वयाने केस पांढरे होणे ही सामान्य गोष्ट आहे. परंतु, वयाच्या 25व्या वर्षात जर तुमचे केस पांढरे होऊ लागले असतील, तर ही गंभीर गोष्ट आहे.

पांढऱ्या केसांमुळे त्रस्त आहात?, थांबा ‘हे’ नैसर्गिक घटक वापरून पाहा!
केस पांढरे होत आहेत का? मग त्वरीत करा 'हे' उपाय
Follow us
| Updated on: Mar 25, 2021 | 8:56 AM

मुंबई : वाढत्या वयाने केस पांढरे होणे ही सामान्य गोष्ट आहे. परंतु, वयाच्या 25व्या वर्षात जर तुमचे केस पांढरे होऊ लागले असतील, तर ही गंभीर गोष्ट आहे. केस पांढरे होण्याची अनेक कारणे असू शकतात. बर्‍याचदा योग्य पोषणाच्या कमतरतेमुळे आणि अनुवांशिक कारणांमुळे देखील केस पांढरे होऊ लागतात. परंतु, जास्त प्रमाणात तंबाखूचे सेवन, धूम्रपान आणि भावनिक ताण हे देखील केसांच्या या समस्येचे कारण ठरू शकते. पांढर्‍या केसांच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी काही घरगुती उपाय आहेत, ज्याचा आपण अवलंब करून पाहू शकता. (Follow these tips to get rid of white hair)

-आल्याचा किस दुधामध्ये टाकून त्याची घट्ट पेस्ट बनवा. ही पेस्ट डोक्याला लावा, आणि 20 मिनीटांनंतर केस धुवा. आठवड्यातून एकदा ही डोक्याला लावा.

-नारळाच्या तेलामध्ये थोडासा लिंबाचा रस आणि कडीपत्त्याची पान टाका. हे मिश्रण गरम करा. कडीपत्त्याची पानं काळी होईपर्यंत हे मिश्रण गरम करा. आंघोळ करायच्या १० मिनीटं आधी या तेलानं डोक्याची मालिश करा.

-आवळा केसांचा नैसर्गिक काळा रंग टिकवून ठेवण्यात मदत करतो. यासाठी आवळा कुस्करून त्याच्या बिया काढून घ्या. कुस्करलेल्या आवळ्याची एक पेस्ट बनवून डोक्यावर लावा. तसेच याने केसांच्या मुळांवर मसाज करा. यामुळे केसांचा रंग गडद होईल.

-पांढरे केस काळे करण्यासही काळे तीळ खूप उपयुक्त आहेत. यासाठी दररोज रिकाम्या पोटी, पाण्याबरोबर कच्चे तीळ खाणे फायद्याचे ठरेल

-कांद्याची पेस्ट केसांना पोषण देते. यासाठी कांद्याची पेस्ट केसांना लावा. एक तासानंतर केस धुवा. असे केल्याने पांढरे केसही काळे होतील.

-मेहंदी पावडर आणि दह्याचं समान मिश्रण एकत्र करून केसांचा मसाज करा. आठवड्यातून एकदा हा उपाय करा.

-मेंदी आणि तेजपत्ता या दोन्ही वनस्पतींनी केसांचा रंग अधिक गडद होतो. अर्धी वाटी कोरडी मेंदी आणि तमालपत्रात दोन कप पाणी मिसळून उकळा. थंड झाल्यावर ते गाळून घ्या आणि केस धुतल्यानंतर त्यांच्यावर चांगले लावा. 15-20 मिनिटांनंतर केस पुन्हा धुवा.

(टीप : कुठल्याही उपचारापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.)

संबंधित बातम्या : 

Hair Care | केस गळती, कोंड्याची समस्या? सगळ्यांवर रामबाण उपाय ठरेल बहुगुणकरी ‘रीठा’!

(Follow these tips to get rid of white hair)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.