मुंबई : लोक त्वचा निरोगी ठेवण्यासाठी नेहमी विविध उपाय ट्राय करतात. निरोगी आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी, विविध सौंदर्य उत्पादनांचा वापर करतात. आपल्या त्वचेची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे. सर्वांनाच आपली त्वचा निरोगी आणि चमकणारी हवी असते. परंतु व्यस्त वेळापत्रकांमुळे बहुतेक लोक त्वचेची काळजी घेऊ शकत नाहीत. (Follow these tips to keep skin healthy)
त्यामुळे आपली त्वचा कोरडी, डोळे सुजलेले, सुरकुत्या, मुरुम आणि डाग चेहऱ्यावर दिसू लागतात. चेहऱ्यावरील मुरुमांच्या समस्येमुळे तुम्ही त्रस्त आहातर सैंड मास्क वापरा. हे आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. आपण हा मास्क आपण दररोज वापरू शकता. जर तुम्हाला शक्य असेल तर मास्कमध्ये कोरफड जेल, व्हिटॅमिन ई, जोजोबा तेल आणि सूर्यफूलाच्या बियांचा देखील समावेश करू शकता.
यामुळे आपली त्वचा निरोगी आणि चमकदार बनवेल. शीट मास्क त्वचेसाठी चांगला आहे. बहुतेक शीट मास्क त्वचा स्वच्छ करण्याचे तसेच शुद्ध करण्याचे काम करतात. शक्यतो रात्रीच्या वेळी शीट मास्क वापरला पाहिजे. जर आपल्याला चांगली त्वचा पाहिजे असले तर रात्री झोपण्यापूर्वी नाईट क्रीमचा वापर करा.
यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या दिसणार नाहीत. नाईट क्रीम लावल्याने तुमची त्वचा निरोगी राहते. तसेच त्वचेच्या पेशी वाढवते आणि तेजस्वी देते. त्वचेवरील मृत त्वचेचा थर काढून टाकण्यासाठी हलक्या हातांनी चेहरा स्क्रब करावा. हलक्या हातांनी नेहमी चेहरा घासा. जर, आपण हातांनी जास्त जोर दिल्यास चेहऱ्यावर पुरळ उठू शकते.
संबंधित बातम्या :
Eczema Myth | ‘एक्झिमा’ आजाराबद्दल लोकांमध्ये संभ्रमाची स्थिती, जाणून घ्या या मागचं पूर्ण सत्य…#eczema | #Health | #skincare | #skincareproducts https://t.co/azKyegZj0a
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 26, 2021
(Follow these tips to keep skin healthy)