घरीच मिक्स सॉस पास्ता तयार करायचाय?, मग ‘या’ टिप्स फाॅलो करा…

आरोग्याच्या दृष्टीने विचार करता, बाहेरील अन्नपदार्थ अर्थात जंकफूड हे हानिकारक असते.

घरीच मिक्स सॉस पास्ता तयार करायचाय?, मग 'या' टिप्स फाॅलो करा...
पास्ता
Follow us
| Updated on: Mar 20, 2021 | 9:43 AM

मुंबई : आरोग्याच्या दृष्टीने विचार करता, बाहेरील अन्नपदार्थ अर्थात जंकफूड हे हानिकारक असते. अनेकांच्या बाबतीत तर जंक फूड खाणे पूर्णपणे वर्ज्य आहे. ज्यांना हे पदार्थ खाण्याची आवड आहे, अनेक प्रयत्न करूनही त्यांना ही सवय मोडता येत नाही. तुम्हीही पास्ता खाण्याचे शाैकिन आहात तर तुमच्यासाठी ही खास बातमी कारण आज आम्ही तुम्हाला घरी पास्ता कसा तयार करायचा हे सांगणार आहोत. (Follow these tips to make mixed sauce pasta at home)

-कढईत चिमूटभर मीठ घालून थोडेसे पाणी उकळवा आणि त्यामध्ये पास्ता घाला. त्यानंतर पास्ताला दोन ते तीन मिनिट शिजवा आणि नंतर पास्त्यामधील सर्व पाणी काढून टाका. त्यानंतर पास्त्याला हलवत राहा.

-कढईत थोडे ऑलिव्ह तेल गरम करून त्यात किसलेले आले घाला. काही सेकंद परता आणि नंतर अर्धा कप कॉर्न आणि बारीक चिरलेला कांदा घाला. घरात उपलब्ध असेल तर शिमला मिर्च देखील यामध्ये घालू शकता.

-आता कढईत दोन मध्यम आकाराचे बारीक चिरलेला टोमॅटो घाला. भाजी मऊ होईपर्यंत 2-3 मिनिटे शिजवा. त्यात 3 चमचे टोमॅटो प्यूरी घाला आणि नीट मिक्स करून घ्या.

-यानंतर मीठ, लाल तिखट आणि ओरेगॅनो मिसळा. सॉस तयार करण्यासाठी, लोण्यामध्ये लसूणच्या बारीक चिरलेल्या पाकळ्या घाला.

-आता तयार केलेली ही चटणी पास्त्यामध्ये मिक्स करा. सॉस एकत्र होईपर्यंत एक-दोन मिनिट शिजवा. अशाप्रकारे तुमचा स्वादिष्ट पास्ता तयार होईल.

-जर आपल्याला जंकफूडची तलफ येत असले, तर शक्यतो हे पदार्थ घरीच बनवण्याचा प्रयत्न करा. तसेच, त्यात अधिकाधिक भाजीपाला आणि आरोग्याच्या दृष्टीने इतर फायदेशीर गोष्टी समविष्ट करा. यामुळे जंकफूडची क्रेविंगही पूर्ण होईल आणि आरोग्याच्या दृष्टीनेही अनेक लाभ होतील.

-काही लोकांना नेहमीच कोल्ड ड्रिंक पिण्याची सवय असते. असे लोक जेव्हा जंकफूड खातात, तेव्हा त्यासोबत कोल्डड्रिंक, आईस टी, कोल्ड कॉफी या सारख्या कोल्ड ड्रिंक पितात. कोल्ड ड्रिंकसह जंकफूड खाल्ल्याने, त्यातील अतिरिक्त चरबी आणि कार्बोहायड्रेट आतड्यांमधे चिकटतात. यामुळे आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. तर अशा वेळी जंकफूड खायला जाताना या कोल्ड्रिंकऐवजी एखादे गरमागरम सूप ऑर्डर करा. जर आपल्याला सूप आवडत नसेल, तर आपण गरम कॉफी देखील पिऊ शकता. मात्र, जंक फूडसह थंड पदार्थ खाणे किंवा पिणे टाळा.

संबंधित बातम्या : 

(Follow these tips to make mixed sauce pasta at home)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.