टॅनिंग काढून टाकण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय ट्राय करा !
धावपळीच्या जीवनशैलीमुळे आपण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. याचबरोबर आणि त्वचेकडे देखीर विशेष लक्ष देऊ शकत नाहीत.
मुंबई : धावपळीच्या जीवनशैलीमुळे आपण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. याचबरोबर त्वचेकडे देखीर विशेष लक्ष देऊ शकत नाहीत. यामुळे त्वचेच्या विविध समस्या निर्माण होतात. विशेष करून टॅनिंगची समस्या उद्भवते. ज्याचा तुमच्या सौंदर्यावर परिणाम होतो. जर अशी समस्या असेल तर टॅनिंग काढून टाकण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहोत. (Follow these tips to remove tanning)
-लिंबाचा रस आणि मध फेसपॅक – 1 चमचे मध आणि 1 चमचे लिंबाचा रस मिसळून पेस्ट बनवा. ते चेहऱ्यावर लावा आणि 1 तास ही पेस्ट चेहऱ्यावर ठेवा. यानंतर ते थंड पाण्याने धुवा. हा लिंबाचा रस नैसर्गिक ब्लीचप्रमाणे कार्य करतो आणि मध त्वचेमध्ये ओलावा राखतो.
-ओट्स आणि ताक फेसपॅक- 4 चमचे ताकामध्ये 2 चमचे ओट्स घाला. 30 मिनिटांसाठी त्याला चांगले भिजू द्या. यानंतर, ते चेहरा आणि मान वर लावा. 2 तासानंतर ते कोमट पाण्याने चेहरा धुवा.
-चंदन आणि गुलाब पाणी फेसपॅक – 2 चमचे चंदन पावडरमध्ये गुलाब पाणी घालून पेस्ट बनवा. यानंतर ते त्वचेवर 2 तासांसाठी लावा. थंड पाण्याने धुवावे. हे आपली त्वचा थंड करते.
-दूध आणि तांदळाचा पीठाचा फेसपॅक – तांदळाच्या पिठात 2 चमचे दूध मिसळून जाड पेस्ट बनवा. 1 किंवा 2 तासांसाठी चेहऱ्यावर लावा. यानंतर ते थंड पाण्याने धुवा. हे त्वचा चमकदार करते.
-एका भांड्यात एक चमचा कॉफी, दही आणि एक चिमूटभर हळद घालून पेस्ट तयार करावी लागेल. नंतर ही पेस्ट चेहर्यावर लावा आणि सुमारे 20 मिनिटांनंतर पाण्याने धुवा. आठवड्यातून दोनदा ही पेस्ट चेहऱ्याला लावा.
-लिंबूमध्ये भरपूर व्हिटॅमिन सी असते, जे त्वचा चमकदार बनविण्यासाठी कार्य करते. हे फेसपॅक बनविण्यासाठी तुम्हाला एका भांड्यात एक चमचा कॉफी आणि एक चमचा लिंबाचा रस मिसळावा लागेल. ते चांगले मिसळावे जेणेकरुन ते एकसारखे मिक्स व्हायला पाहिजे. ही पेस्ट सुमारे 15 मिनिटे चेहर्यावर लावा आणि नंतर ते पाण्याने धुवा.
(टीप : कुठल्याही कृतीपूर्वी डॉक्टरांचा किंवा सौंदर्यतज्ज्ञांचा सल्ला घेणे बंधनकारक आहे.)
संबंधित बातम्या :
Health | ‘व्हिटामिन डी’ची कमतरता आरोग्यासाठी धोकादायक! ‘या’ पदार्थांचे सेवन ठरेल लाभदायकhttps://t.co/y89Pxceis3#VitaminD #FoodSupplement
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 20, 2020
(Follow these tips to remove tanning)