Health Tips : उन्हाळ्याच्या हंगामात शरीराचे तापमान कमी ठेवण्यासाठी या खास टिप्स फाॅलो करा!
आता वातावरणामध्ये बदल झाला आहे. उन्हाळ्याची (Summer) चाहूल लागली आहे. दुपारच्या वेळी उन्हामध्ये घराच्या बाहेर पडले तर लाही लाही होण्यास सुरूवात झाली आहे. या हंगामात आपल्या आरोग्याची (Health) विशेष काळजी घेणे अतिशय महत्वाचे आहे.
मुंबई : आता वातावरणामध्ये बदल झाला आहे. उन्हाळ्याची (Summer) चाहूल लागली आहे. दुपारच्या वेळी उन्हामध्ये घराच्या बाहेर पडले तर लाही लाही होण्यास सुरूवात झाली आहे. या हंगामात आपल्या आरोग्याची (Health) विशेष काळजी घेणे अतिशय महत्वाचे आहे. आपल्या शरीराचे सरासरी तापमान 98.6°F (37°C) असते. शरीराचे तापमान देखील शरीराच्या क्रियांवर आणि दिवसाच्या कोणत्या वेळी कोणते काम केले जाते यावर अवलंबून असते. मानवी रक्त उबदार असल्यामुळे एखादी व्यक्ती स्वतःच्या शरीराचे तापमान (Temperature) नियंत्रित करू शकते.
तरुण लोक हे तापमान नियंत्रित करू शकतात तसेच प्रौढ देखील करू शकतात. कारण वयानुसार आपली चयापचय क्रिया कमी होत जाते. परिणामी ते पचायला वेळ लागतो. आणि चयापचय कमी होताच, शरीराचे तापमान कमी होते. म्हणूनच वृद्ध लोकांना हायपोथर्मियाचा धोका जास्त असतो. यामुळे या हंगामामध्ये तरूणांपेक्षा ज्येष्ठ व्यक्तींना आपल्या आरोग्याची अधिक काळजी ही घ्यावी लागते.
अशी घ्या उन्हाळ्यामध्ये शरीराची काळजी
आपल्या शरीराचे तापमान उन्हाळ्याच्या हंगामात चांगले ठेवण्यासाठी नेहमी काळजी घ्या. यासाठी आहार व्यवस्थित असणे आवश्यक आहे. आपण या हंगामामध्ये शक्यतो हलक्या स्वरूपाचे जेवण घेतले पाहिजे. विशेष म्हणजे मसालेदार आणि तळलेले पदार्थ खाणे तर पूर्णपणे टाळाच. चपाती, भाजी, सूप, सलाड आणि शक्यतो घरगुती जेवण या हंगामात घेतले पाहिजे. ब्रेकफास्टमध्ये फळे आणि ज्यूस घेण्याचा प्रयत्न करा.
या हंगामामध्ये आपल्या शरीराला पाण्याची अधिक आवश्यक्ता असते. जर आपण व्यवस्थित पाणी पिले नाहीतर आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. उन्हाळ्याच्या हंगामात किमान 7 ते 8 ग्लास पाणी दिवभरामध्ये पिण्याचा प्रयत्न करा. तसेच दुपारच्या वेळी आपण कलिंगड, खरबूज, काकडी यांचे ज्यूस घेतले पाहिजे. शरीर थंड करण्यासाठी आपल्या आहारामध्ये ताकाचाही समावेश करा. ताक पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
(वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला घ्या)
संबंधित बातम्या :
सिगारेटचे व्यसन असणाऱ्यांसाठी अत्यंत धोक्याची घंटा, दृष्टी जाण्याचाही धोका, वाचा संशोधन काय म्हणते!