चार आश्चर्यकारक पदार्थ खा अन् मधुमेह नियंत्रणात ठेवा
मधुमेह नियंत्रित करण्यासाठी नैसर्गिक पद्धतींचा अवलंब करू शकतात. आयुर्वेदामध्ये अश्या कितीतरी गोष्टी आहेत ज्यामुळे मधुमेह नियंत्रणात करता येऊ शकतो.
मधुमेह आता सामान्य आजार बनला आहे. शरीरातील ग्लुकोजचे प्रमाण वाढले की मधुमेह होतो. चुकीच्या जीवनशैलीमुळे मधुमेहाचा धोका झपाट्याने वाढत आहे. भारतात मधुमेहाचे सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत .मधुमेहाचे दोन प्रकारे आहेत टाईप एक आणि टाईप दोन.
आहाराची आणि जीवनशैलीची अधिक काळजी मधुमेह असलेल्यांना घ्यावी लागते. थोडासा देखील निष्काळजीपणा मधुमेह असलेल्या लोकांना त्रासदायक ठरू शकतो.मधुमेह ही समस्या नियंत्रणात ठेवली जाऊ शकते. मधुमेह असलेल्या लोकांनी संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप घेणे महत्त्वाचे आहे.
रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी तुम्ही नैसर्गिक पद्धतींचा अवलंब करू शकतात. आयुर्वेदामध्ये अश्या कितीतरी गोष्टी आहेत ज्यामुळे मधुमेह नियंत्रणात करता येऊ शकतो. येथे काही तज्ञांनी घरगुती उपाय सांगितले आहेत ज्याने मधुमेह नियंत्रणात करणे सहज शक्य होईल.
कडुलिंबाची पाने
कडूलिंबाच्या पानांमध्ये नैसर्गिक जिवाणूनाशक, विषाणूविरोधी आणि बुरशीविरोधी गुणधर्म असतात. हे रक्तातील साखर संतुलित करण्यास मदत करतात. तुम्ही दहा ते बारा ताजी कडुलिंबाची पाने रात्रभर पाण्यात भिजत ठेवून ते सकाळी रिकाम्या पोटी चघळले तर मधुमेह नियंत्रणात राहू शकतो.
बडीशेप
वेलची प्रमाणेच बडीशेप देखील एक सुगंधी मसाला आहे. हे तोंड स्वच्छ करण्यासाठी वापरले जाते पण याचा वापर घरगुती उपायांमध्येही केला जातो. यामध्ये भरपूर प्रमाणात अंटीऑक्सीडेंट आणि फायबर असते. ज्यामुळे साखरेची पातळी नियंत्रित राहते. बडीशेप पाण्यामध्ये भिजवून खाल्ल्यास मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत होईल.
मेथीचे दाणे
मेथीच्या दाण्यांमध्ये भरपूर फायबर आणि अँटिऑक्सिडंट असतात. त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. रात्री एक चमचा मेथीचे दाणे पाण्यात भिजवून ठेवून ते सकाळी चावून खाल्ल्यास किंवा त्याचे पाणी पिल्यास खूप फायदा होईल.
आवळा
आवळ्यामध्ये विटामिन सी आणि अँटिऑक्सिडंट आढळतात. मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी हे फायदेशीर मानले जाते. यासाठी रात्री आवळ्याचे दोन ते तीन तुकडे पाण्यात भिजवून ठेवून हे सकाळी उठल्यानंतर खाल्ल्याने मधुमेह नियंत्रणात राहतो.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)