जगातील अशी 4 ठिकाणे, जिथे अनेक महिने मावळत नाही सूर्य
ही पृथ्वी असंख्य आश्चर्यांनी भरलेली आहे. या पृथ्वीवर अशी बरीच ठिकाणं आहेत, जिथे निसर्गाचं एक वेगळं रुप पहायला मिळतं. आपल्या देशात सूर्योदय आणि सुर्यास्त झाला म्हणजे दिवस-रात्रीमधला फरक लक्षात येतो. पण अशीही काही ठिकाणं आहेत जिथे अनेक महिने रात्रच होत नाही.
मुंबई : 16 जानेवारी 2024 | आपल्या जगात अशी विविध शहरे आहेत ज्यांची काही वैशिष्ट्ये आहेत. ही संपूर्ण दुनिया अनेक आश्चर्यपूर्ण गोष्टींनी भरली आहे. त्यातीलचं एक अनोखी बाब म्हणजे आपल्या पृथ्वीवर एक नाही तर अशी काही ठिकाणे आहेत जिथे अनेक महिने सूर्य मावळतच नाही. जिथे सूर्य मावळतच नाही, तिथे रात्र कशी होत असेल बरं? दिवसाची सुरुवात कधी झाली आणि दिवस मावळला कधी, हे तिथल्या लोकांना कसं समजत असेल बरं? ही ठिकाणं कोणती आहेत, ते पाहुयात..
नॉर्वे : सूर्य लवकर न मावळणाऱ्या देशांच्या यादीत नॉर्वे हे पहिल्या क्रमांकावर येतं . हा देश युरोपच्या उत्तरेस वसलेला असून तिथलं वातावरण समशीतोष्ण आहे. या देशात सुर्योदयाचा कालावधी अधिक असून सूर्यास्ताचा कालावधी फार कमी असतो.
नुनावुत, कॅनडा : उत्तर कॅनडा आर्क्टिक सर्कलपासून दोन अंश वर स्थित आहे. या प्रदेशातील लोकसंख्या इतर देशांच्या तुलनेत कमी आहे. इथे फक्त 3 हजार लोकच राहतात. या देशात वर्षाचे 60 दिवस सूर्य मावळत नाही. मात्र थंडीच्या दिवसांत इथे तीस दिवसांपर्यंत अंधारच असतो. जगातील सर्वांत थंड ठिकाणांमध्ये याचा समावेश होते.
स्वीडन : स्वीडन हा युरोप खंडातील एक असा देश आहे ज्याला चारही बाजुने समुद्राने वेढलेलं आहे. हा जगातील सर्वांत सुंदर शहरांपैकी एक आहे. इथे मे महिन्याच्या सुरुवातीपासून ऑगस्टच्या शेवटपर्यंत सूर्य 12.00 च्या आसपास मावळतो. तर पहाटे 4.30 वाजता पुन्हा सूर्योदय होतं. या देशात सतत 6 महिने सकाळच असते.
आईसलँड : उत्तर युरोपातील अटलांटिक महासागरात वसलेला द्वीप देश म्हणून आईसलँड ओळखला जातो . या देशाची विशेष गोष्ट म्हणजे इथे सूर्य लवकर मावळत नाही. तसेच हा निसर्गसौंदर्याने नटलेला देश आहे. या देशात हिवाळा जास्त कालावधीचा असतो मात्र उन्हाळा फार कमी असतो. य