ऑनलाइन शॉपिंग करताना या गोष्टींची काळजी घ्या, तुमचा एक क्लिक करेल मोठं नुकसान

लॉकडाउननंतर ऑनलाईन शॉपिंगकडे लोकांचा कल वेगानं वाढला आहे. आपल्याला फक्त एका क्लिकवरुन ऑर्डर केलेली वस्तू किंवा सामानाची घरी डिलिव्हरी मिळते.

ऑनलाइन शॉपिंग करताना या गोष्टींची काळजी घ्या, तुमचा एक क्लिक करेल मोठं नुकसान
Follow us
| Updated on: Jan 23, 2021 | 5:13 PM

मुंबई : लॉकडाउननंतर ऑनलाइन शॉपिंगकडे लोकांचा कल वेगानं वाढला आहे. आपल्याला फक्त एका क्लिकवरुन ऑर्डर केलेली वस्तू किंवा सामानाची घरी डिलिव्हरी मिळते. ऑनलाइन शॉपिंग करताना अनेक प्रकारचे पर्याय आणि ऑफर देखील आपल्याला मिळतात. परंतू लक्षात ठेवा की, प्रत्येक गोष्टीचे काही फायदे आणि काही तोटे देखील असतात. म्हणूनच, जर तुम्ही ऑनलाइन शॉपिंग करत असालतर काही गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. (Fraud can occur when shopping online)

हॉटेल्स, कॅफे किंवा रेस्टॉरंट्स इत्यादी मध्ये सार्वजनिक वाय-फाय सुविधा आहेत ज्याला तुम्ही तुमचा मोबाइल लगेच कनेक्ट करू शकता. मात्र, लक्षात ठेवा जेव्हा आपला फोन सार्वजनिक वायफायशी कनेक्ट केले असेल तेव्हा ऑनलाइन खरेदी करण्याचे टाळा. बर्‍याच वेळा सार्वजनिक वाय-फाय कनेक्शन सुरक्षित नसतं. अशा परिस्थितीत, आपली माहिती हॅकरपर्यंत पोहोचवली जाऊ शकते आणि तुम्हाला मोठं नुकसान होऊ शकतं.

ऑनलाइन शॉपिंग करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालेली आहे. अशा परिस्थितीत, अनेक साइट आकर्षक ऑफर दर्शवून ग्राहकांना आकर्षित करतात. परंतु खरेदी नेहमीच एका विश्वसनीय साइटवरून केली जावी कारण बिलिंग दरम्यान घरातील पत्ता, मोबाइल नंबर, क्रेडिट किंवा डेबिट कार्ड यासारखी सर्व माहिती द्यावी लागते. अशा परिस्थितीत, साइट सुरक्षित नसल्यास आपली वैयक्तिक माहिती लीक होऊ शकते.

आपण एखाद्या नवीन साइटला भेट देऊन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर वेबसाइटची सुरक्षा तपासण्यासाठी पॅडलॉक चिन्ह पहा. बर्‍याच वेळा चांगली ऑफर पाहिल्यानंतर आपण त्वरित ऑर्डर करतो, परंतु जेव्हा ती वस्तू घरी येते तेव्हा तिची गुणवत्ता अत्यंत खराब असते आणि कोणत्याही परताव्याच्या धोरणाकडे ती परत करण्याचा पर्याय नसतो. म्हणून जेव्हा ऑनलाइन शॉपिंग कराल तेव्हा कोणत्याही उत्पादनाचे रिव्हज वाचले पाहिजे.

संबंधित बातम्या : 

Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो

Papaya Seeds Benefit | तुम्ही पपईच्या बिया फेकून देताय…? तर थांबा अगोदर हे वाचा!

(Fraud can occur when shopping online)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.