Ram Mandir : अयोध्येत मिळतं फ्री जेवण, दर्शनानंतर थेट पोहोचा ‘या’ ठिकाणी, तुम्ही नाही परतणार उपाशी

Ram Mandir and Ram Rasoi : अयोध्येत प्रभू राम यांचा अभिषेक सोहळा सुरू होण्यास अवघ्या काही दिवसांचा कालावधी उरला आहे. संपूर्ण भारतात भक्तीमय वातावरण तयार झालं आहे. अयोध्येत जात असाल तर याठिकाणी आहे जेवणाची व्यवस्था...

Ram Mandir : अयोध्येत मिळतं फ्री जेवण, दर्शनानंतर थेट पोहोचा 'या' ठिकाणी, तुम्ही नाही परतणार उपाशी
अयोध्येतील राम मंदिर
Follow us
| Updated on: Jan 17, 2024 | 12:03 PM

Ram Mandir and Ram Rasoi : अयोध्या याठिकाणी भव्य राम मंदिर सुरु होणार असल्यामुळे संपूर्ण भारतात भक्तीमय वातावरण तयार झालं आहे. 22 जानेवारी रोजी भगवान राम यांची प्राण प्रतिष्ठा होणार आहे. अयोध्येत प्रभू राम यांचा अभिषेक सोहळा सुरू होण्यास अवघ्या काही दिवसांचा कालावधी उरला आहे. त्यामुळे अयोध्या याठिकाणी जय्यत तयारी सुरू आहे. व्हीईआयपी ते व्हीव्हीवायपी आणि सेलिब्रिटींपासून सर्वसामान्यांपर्यंत सर्वच प्रकारची व्यवस्था येथे करण्यात आली आहे. पण सर्वसामान्यांसाठी केलेल्या तयारीबद्दल सांगायचं झालं तर, त्यांच्यासाठी ट्रेन्सपासून फ्लाइट्सपासून हॉटेल्सपासून ते जेवणापर्यंत इत्यादी गोष्टींची सुविधा करण्यात आली आहे… सध्या सर्वत्र राम मंदिराची चर्चा सुरु आहे…

राम मंदिराची स्थापना होणार असल्यामुळे अनेक भक्त अयोध्येत जाणार असतील… पण प्रभू राम यांचं दर्शन झाल्यानंतर भक्तांसाठी प्रसाद म्हणून जेवणाची सोय केलेली असते. सांगायचं झालं तर, अयोध्येत राम रसोई नावाचे एक स्वयंपाकघर आहे, येथे येणाऱ्या भाविकांना मोफत जेवण दिलं जातं. मिळालेल्या माहितीनुसार याठिकाणी 2500 ते 3000 लोक स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेण्यासाठी येतात.

तर आज राम रसोईबद्दल जाणून घेवू… अयोध्येतील अमावा मंदिरात पाटणाच्या महावीर मंदिर ट्रस्टद्वारे राम रसोई हे स्वयंपाकघर चालवलं जातं, ज्यामध्ये दरमहा सुमारे 90 हजार भाविकांना मोफत भोजन दिलं जातं. दररोज सकाळी 11:30 ते दुपारी 3:30 या वेळेत ‘राम रसोई’वर भाविकांना कूपन दिले जातात.

हे सुद्धा वाचा

याठिकाणा विविध जिल्ह्यांतून येणारे भाविक येथे मनसोक्त भोजन करतात. प्रभू राम यांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या कार्यालयातून भाविकांना जेवणासाठी कूपन दिले जातात. हे कूपन दाखवून भक्तांना जेवणाकची थाळी मिळते.

राम रसोईमध्ये 9 प्रकारचे पदार्थ भाविकांना दिले जातात, त्यात दोन प्रकारच्या भाज्या, कचोरी, चटणी, भात, डाळ, कोफ्ता, बटाट्याची भाजी, तूप, पापड… इत्यादी गोष्टींचा समावेश असतो… याशिवाय दक्षिण भारतातील लोकांना डाळीच्या जागी सांबारही दिला जातो.

सांगायचं झालं तर, बिहारच्या सीतामढीमध्ये सीता रसोई सुरू आहे, जिथे दिवसाला 500 ते 1000 लोक येतात आणि रात्री 200 ते 500 लोक जेवायला येतात. सीता रसोई लक्षात घेवून राम रसोई देखील सुरु करण्यात आली आहे….

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.