हिवाळ्यात फ्रिजचा वापर करा सांभाळून, अन्यथा होऊ शकतो बिघाड
हिवाळ्याच्या हंगामात थोडीशी चूक केल्यास तुमचा फ्रिज खराब होऊ शकतो आणि फ्रिज वापरताना या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे.
आता खरा हिवाळा ऋतू सुरु झाला आहे. या ऋतूत सर्वात जास्त थंडी ही उत्तर भारतीय लोकांना जाणवत आहे. यासाठी अनेक जण या कडाकाच्या थंडीपासून बचाव करण्यासाठी अनेक उपकरणे वापरतात. तसेच या दिवसांमध्ये हिटरचा देखील भरपूर वापर केला जातो. उपकरणे वापरतानाही अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. विशेषतः फ्रिज वापरताना काळजी घ्यावी लागते. कारण या ऋतूत तुमची थोडीशी चूक तुमच्या फ्रिजचं नुकसान करू शकते आणि खराब होऊ शकते. फ्रिज वापरताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात ते जाणून घ्या.
फ्रिज भिंतीला लावू नका
साधारणपणे लोकं फ्रिज भिंतीजवळ खेटून ठेवतात. पण हिवाळ्यात फ्रिज भिंतीजवळ ठेवला तर. फ्रिजमध्ये काही अडचणी येऊ शकते. कारण हिवाळ्यात फ्रिज भिंतीजवळ ठेवल्यास खोलीचे तापमान कमी होते. त्यामुळे फ्रिजच्या आतील थंडावा बाहेर येत नाही. अश्याने कॉम्प्रेसरवर दाब पडतो. ज्यामुळे फ्रिज खराब होऊ शकतो.
फ्रिजच्या आजूबाजूला हीटर किंवा फायरप्लेस वापरू नका
हिवाळ्यात थंडी जास्त प्रमाणात जाणवू नये म्हणून घरात अनेकदा फायरप्लेस आणि हीटरचा वापर करतात. यामुळे थंडीपासून आराम मिळतो. पण फ्रिजच्या सभोवतालचे संपूर्ण वातावरण गरम झाल्यामुळे फ्रिजसाठी तापमान योग्य नसल्याने फ्रिज खराब होण्याची शक्यताही वाढते.
जास्त वेळ बंद न ठेवणे
हिवाळ्यात फ्रिजचा वापर कमी केला जातो. थंडीच्या दिवसात पदार्थ लवकर खराब होत नसल्याने फ्रिजमध्ये अनेक गोष्टी ठेवणे टाळतो. त्यामुळे अनेक जण फ्रिजही बंद करतात. परंतु असे वारंवार केल्याने किंवा जास्त वेळ फ्रिज बंद ठेवल्यास गॅस गळती होऊ शकते.