Friendship Day 2023 | फ्रेंडशिप डे ला खास बनवण्यासाठी हा प्लॅन ठरू शकतो सर्वोत्तम!
6 ऑगस्ट 2023 रोजी फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. या फ्रेंडशिप डेला खास बनवण्यासाठी तुम्ही त्यांच्यासोबत गेट टू गेदर करू शकता. अशावेळी तुम्ही त्यांच्यासोबत काही खास पदार्थ ट्राय करू शकता. कोणते पदार्थ आहेत? जाणून घेऊयात...
मुंबई: मैत्री हे खूप मौल्यवान नातं आहे. आयुष्याच्या शेवटच्या प्रवासापर्यंत हे नातं टिकवणंही खूप अवघड असतं. पण मित्र जर खरे असतील तर आयुष्याचा आनंदच वेगळा! 6 ऑगस्ट 2023 रोजी फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. या फ्रेंडशिप डेला खास बनवण्यासाठी तुम्ही त्यांच्यासोबत गेट टू गेदर करू शकता. अशावेळी तुम्ही त्यांच्यासोबत काही खास पदार्थ ट्राय करू शकता. कोणते पदार्थ आहेत? जाणून घेऊयात…
पिझ्झा: पिझ्झाच्या शेवटच्या तुकड्यासाठी लोक अजूनही भांडतात. पिझ्झा हा मित्रांसोबत एकत्र येऊन खाण्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे.
चिप्स: मित्र-मैत्रिणी एकत्र असतात आणि चिप्स नसतात, असं होत नाही. गप्पा मारता मारता चिप्स खाणे हे एक उत्तम ऑप्शन आहे. चिप्स खाल्ल्याने मित्र-मैत्रिणींमध्ये एक वेगळीच आसक्ती निर्माण होते. हा फ्रेंडशिप डे खास करण्यासाठी तुम्ही सर्व जण चांगल्या ठिकाणी भेटून चिप्सच्या पॅकेटने आपल्या भाषणाची सुरुवात करा.
पॉपकॉर्न: या फ्रेंडशिप डेला तुम्ही मित्रमैत्रिणींना भेटा आणि त्यांच्यासोबत फिरताना पॉपकॉर्न खा.
चहा आणि सामोसा: चहा आणि समोसा याचा मैत्रीमध्ये मोलाचा वाटा आहे. चहाच्या टपरीवर बसून मित्रांसोबत समोसे खाणे, जुने किस्से सांगणे आणि हसणे. या फ्रेंडशिप डेला पुन्हा एकदा हे सगळं करा. तुम्हाला खूप मजा येईल.
कांदा भजी : या फ्रेंडशिप डेला तुम्ही तुमच्या खास मित्रांना घरी बोलावून सेलिब्रेट करू शकता. यासाठी कांद्याचे भजी आणि कोथिंबीर चटणी घरीच बनवा. गरमागरम भजी आणि चटणी खाताना मित्रांशी बोलणे हा आयुष्यातील सर्वोत्तम क्षण असेल.