रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करायचीय? मग दररोज खा ‘लसूण’
आपल्या आरोग्यासाठी लसूण खाणे अत्यंत फायदेशीर आहे. कच्चा लसूण खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
मुंबई : आपल्या आरोग्यासाठी लसूण खाणे अत्यंत फायदेशीर आहे. कच्चा लसूण खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. जेवण बनवताना त्यात लसूण घातल्यास पदार्थाची चव अनेक पटींनी वाढते. शरीर निरोगी ठेवण्यासाठीही लसूण खूप फायदेशीर मानली जाते. आयुर्वेदात लसूण एक उत्तम औषध म्हणून वापरली जाते. लसूनमध्ये भरपूर प्रमाणात एलिसिन, झिंक, सल्फर, सेलेनियन आणि व्हिटॅमिन ए आणि ई सुद्धा आहेत. (Garlic is beneficial for boosting the immune system)
दररोज सकाळी साधारण सहा ते सात लसूणचा पाकळ्या खाल्ल्या पाहिजे. लसूण फक्त रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीच नाहीतर इतरही अनेक आजारांवर रामबाण आहे. हिमोग्लोबिनचा अभाव म्हणजे शरीरात लाल रक्तपेशींचा अभाव. ज्यास सामान्य भाषेत अशक्तपणा म्हणतात. आपल्या शरीरात रक्ताची कमतरता असल्यास, आपण जास्त प्रमाणात लसणाचे सेवन करणे टाळावे.
काही लोक सकाळी रिक्त पोटी कच्चा लसूण खातात, त्याचे बरेच फायदे देखील आहेत. परंतु, जर तुम्हाला डोकेदुखीची समस्या असेल, तर तुम्ही कच्चा लसूण खाऊ नये. कच्च्या स्वरूपातील लसणीचे सेवन डोकेदुखीसाठी ट्रिगर म्हणून काम करते. वयाच्या 40व्या वर्षानंतर चेहऱ्याचे सौंदर्य कमी होण्यास सुरुवात होते. बर्याच लोकांची त्वचा या वयात सैल होऊ लागते. या सुरकुत्या लपवण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. परंतु, बऱ्याचदा त्याचा काही फायदा होत नाही.
अशा लोकांसाठी लसूण खूप उपयुक्त आहे. यासाठी लसणाच्या रसात मध आणि लिंबू मिसळून त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट 10 मिनिटांसाठी आपल्या चेहऱ्यावर लावा. नंतर चेहरा पाण्याने धुवा. आठवड्यातून दोनदा हा उपाय केल्याने आपल्याला काही दिवसात फरक दिसून येईल.जर आपल्याला उच्च रक्तदाबाची समस्या असेल, तर लसूण आपल्यासाठी खूप फायदेशीर आहे. परंतु रक्तदाब कमी असल्यास लसूणचे सेवन केल्याने आपली समस्या वाढू शकते. वास्तविक, लसूण रक्तदाब कमी करण्यासाठी उत्तम कार्य करतो.
संबंंधित बातम्या :
Immunity Booster | थंडीच्या दिवसांत आवळ्याचा रस आरोग्यवर्धक, इम्युनिटी वाढवण्यासाठी ‘हे’ नक्की ट्राय करा!https://t.co/XPmKiIDsHE#ImmunityBooster #AmlaJuice
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 28, 2020
(Garlic is beneficial for boosting the immune system)