तुपामुळे वजन वाढण्याची भीती वाटते? मग ‘हे’ नक्कीच वाचा….
जर आपण सतत आपले वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल, तर आपण आपल्या आहारातून चरबी वाढवणार्या गोष्टी नक्कीच काढून टाकल्या असतील.
मुंबई : जर आपण सतत आपले वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल, तर आपण आपल्या आहारातून चरबी वाढवणार्या गोष्टी नक्कीच काढून टाकल्या असतील. या चरबीयुक्त पदार्थांमध्ये तूप पहिल्या क्रमांकावर असेल. मात्र, तुम्हाला हे माहिती आहे का? तूपामुळे आपले वजन वाढत नाही तूपामुळे वजन वाढतं किंवा स्थुलता येते असा अनेक जणांचा गैरसमज आहे. मात्र, तसं अजिबात नसून तुपामुळे शरीराला वंगण मिळतं. त्यामुळे आहारात दररोज साजूक तुपाचा वापर केला पाहिजे. (Ghee does not cause weight gain, it is beneficial for your health)
-आहारात तुप घेतल्याने त्वचा तजेलदार होते.
-बऱ्याच जणांना असे वाटते की, तुपाचे सेवन केल्याने पित्ताचा त्रास होईल, मात्र तुपाचे सेवन केल्याने पित्ताचा त्रास होत नाही.
-तुपाचे सेवन केल्याने अन्नपचन देखील सुरळीत होते.
-ज्या लोकांना वाताचा त्रास आहे. त्यांनी तुपाचे सेवन केले पाहिजे.
-तुपाचे सेवन केल्यामुळे पचनक्रिया सुधारते.
-तुपाचे सेवन केल्याने अपचन, गॅसेस यांचा त्रास कमी होतो.
तज्ज्ञ म्हणतात की, तूप ओमेगा-3 फॅट आणि ओमेगा-6 फॅटने समृद्ध आहे आणि आपले वजन कमी करण्यासाठी हे घटक खूप चांगले ठरू शकतात. याव्यतिरिक्त, तूपातील ओमेगा-3 फॅटी अॅसिडस् आपल्या शरीरातील काही ‘इंच’ कमी करण्यात मदत करतात, जे आपल्या शरीराचे वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात.
(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
संबंधित बातम्या :
Milk Testing : सावधान! घट्ट दिसण्यासाठी दुधात मिसळले जातायत ‘हे’ घटक, अशी तपासा दुधाची शुद्धता
हंगामी सर्दी-खोकल्यावर रामबाण उपाय ‘काळीमिरी’, जाणून घ्या याचे महत्त्वाचे फायदे…https://t.co/pe3zkVHUt4#BlackPepper #health
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 25, 2020
(Ghee does not cause weight gain, it is beneficial for your health)