रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आले, काळी मिरी आणि मध जबरदस्त फायदेशीर, वाचा !
कोरोनाच्या काळात चांगली रोगप्रतिकारक असणे आवश्यक आहे. कारण रोगप्रतिकारक शक्ती आपल्या शरीरास रोगांविरूद्ध लढायला मदत करते.
मुंबई : कोरोनाच्या काळात चांगली रोगप्रतिकारक शक्ती असणे आवश्यक आहे. कारण रोगप्रतिकारक शक्ती आपल्या शरीरास रोगांविरूद्ध लढायला मदत करते. हे शरीरातून रोगजनक आणि जीवाणू काढून टाकण्याचे काम करते. इतकेच नाही तर रोगप्रतिकारक शक्ती चांगली असेल तर फक्त कोरोनाच नाहीतर इतरही आजारांपासून आपण दूर राहू शकतो. रोगप्रतिकारक शक्ती चांगली ठेवण्यासाठी, निरोगी खाण्याबरोबरच निरोगी जीवनशैली देखील महत्वाची आहे. (Ginger, black pepper and honey are beneficial for boosting the immune system)
आज आम्ही तुम्हाला रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी एक घरगुती उपाय सांगणार आहोत. ज्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होईल. यासाठी तुम्हाला कुढलेही साहित्य बाजारातून आणण्याची आवश्यक्ता नाहीतर घरामध्ये मिळणाऱ्या साहित्यातून तुम्ही हे करू शकता. यासाठी खाली दिलेल्या वस्तू तुम्हाला लागणार आहेत.
-एक आले
-काळी मिरी
-एक चमचा मध
-एक ग्लास पाणी
आले, काळी मिरी आणि मध हे एक ग्लास पाण्यामध्ये टाका आणि हे पाणी गरम करून घ्या. दररोज सकाळी तुम्ही हे रिकाम्या पोटी पिले तर तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. कारण आल्यामध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म आहेत, ज्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढवते. याशिवाय सर्दी आणि खोकल्यातदेखील आले खूप फायदेशीर ठरते. आल्यामुळे स्नायूंना आराम मिळतो. यात अँटी-इंफ्लेमेटरी, अँटी-ऑक्सिडंट, औषधी आणि उपचारात्मक असे बरेच गुणधर्म आहेत.
रोग प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी काळी मिरी फायदेशीर आहे. काळी मिरी एक शक्तिशाली अँटी-ऑक्सिडंट आहे. ज्यामुळे सर्दी आणि खोकला कमी होण्यास मदत होते. कफ प्रकृतीसाठी काळी मिरी खूप फायदेशीर मानली जाते. काळी मिरीत लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम, मॅंगनीज, जस्त, क्रोमियम, व्हिटामिन ए आणि इतर पोषक गुणधर्म आढळतात.
मध खनिजे, जीवनसत्त्वे आणि इतर पोषक तत्वांचा संग्रह आहे. रोगप्रतिकारक शक्ती बळकट करण्याव्यतिरिक्त, मध अनेक प्रकारच्या समस्या दूर करण्यात देखील प्रभावी आहे. आयुर्वेदात याचा उपयोग सर्व रोग बरे करण्यासाठी केला जातो. खोकल्याचा त्रास बराच काळ बरा होत नसेल, तर मधाचे सेवन करणे खूप उपयुक्त ठरू शकते. मधात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे गुणधर्म असतात, जे संसर्ग रोखतात. तसेच, मध कफ सहजपणे काढून टाकतो.
संबंधित बातम्या :
Food | ‘या’ पदार्थांना दूर ठेवा आणि हिवाळ्याच्या काळात सर्दी-खोकल्यापासून सुरक्षित राहा!
Health | मधुमेहाची चिंता सतावतेय? या 5 पदार्थांचा आहारात समावेश करा आणि टेन्शन मुक्त व्हा!https://t.co/5d5zna9tBx#diabetes #Sugar #health
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 30, 2020
(Ginger, black pepper and honey are beneficial for boosting the immune system)