द्राक्षाचे तेल चेहऱ्याला लावल्याने होतील जबरदस्त फायदे, वाचा !
लोक आपली त्वचा निरोगी आणि चमकदार नेहमीच प्रयत्न करत असतात. बाजारामध्ये मिळणारी बरीच ब्युटी प्रॉडक्ट्स वापरतात.
मुंबई : लोक आपली त्वचा निरोगी आणि चमकदार ठेवण्यासाठी नेहमीच प्रयत्न करत असतात. यासाठी बाजारामध्ये मिळणारी बरीच ब्युटी प्रॉडक्ट्स वापरतात. मात्र, या उत्पादनांचे बरेच दुष्परिणाम देखील होतात, जे काळानुसार दिसू लागतात. पण चांगल्या त्वचेसाठी काय करावे हे अनेकांना समजत नाही. मात्र, कधीही त्वचेसाठी आणि केसांसाठी घरगुती उपाय केलेले चांगले असतात. यामुळे आपली त्वचा आणि केस चांगली राहतात आणि कोणतेही दुष्परिणाम त्याचे होत नाहीत. (Grapes oil is beneficial for the skin)
आज आम्ही तुम्हाला अशा एका फळाबद्दल सांगणार आहोत, ज्याच्या सहाय्याने आपण आपली त्वचा सुंदर, तजेलदार करू शकतात. द्राक्षांच्या बियाचे तेल हे आपल्या त्वचेसाठी फायदेशीर असते. व्हिटॅमिन ई आणि ओमेगा अॅसिडचे घटक या तेलात आढळतात आणि हे आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर असते. द्राक्षाच्या तेलामुळे त्वचेवरील दाहक आणि सूक्ष्मजीव निघून जातात आणि मुरुमाची समस्या दूर होते. हे तेल आपण आवडत्या तेलात मिसळून देखील वापरू शकतो.
आपल्या त्वचेवर नियमितपणे द्राक्षाचे तेल लावल्याने त्वचेत व्हिटॅमिन ई आणि सी दोन्ही मिळते. यामुळे आपली त्वचा चांगली होण्यास मदत होते. फॅटी अॅसिडसमवेत द्राक्षाच्या तेलामध्ये पॉलीफेनॉल देखील असते. द्राक्षाच्या तेलात नैसर्गिक गुणधर्म देखील आढळतात जे त्वचा घट्ट करण्यास मदत करतात. छिद्र आणि त्वचेवर बारीक सुरकुत्या दिसणे कमी होते.
चेहर्यावरील काळे डाग दूर करण्यासाठी टोमॅटोइतका चांगला दुसरा घटक नाही. टोमॅटो लाइकोपीनने समृद्ध असतो, जो त्वचेसाठी सनस्क्रीन प्रमाणे काम करतो. यासाठी एका भांड्यात टोमॅटोचा कुस्कुरून त्यात लिंबाचा रस मिसळा. या पेस्टने चेहऱ्यावर गोलाकार मोशनमध्ये मसाज करा.
बदामांमध्ये व्हिटामिन ई भरपूर प्रमाणात असते. बदाम तेल चेहऱ्यावरील काळे डाग दूर करून, रंग उजळण्यास मदत करेल. दररोज रात्री बदामाच्या तेलाने चेहऱ्यावर मसाज करा. हळूहळू, आपला रंग देखील उजळेल आणि त्वचा चमकू लागेल.
संबंधित बातम्या :
Skin Care | चेहऱ्यावर चुकूनही लावू नका ‘या’ गोष्टी, अन्यथा होऊ शकते त्वचेचे नुकसान!
Papaya Seeds Benefit | तुम्ही पपईच्या बिया फेकून देताय…? तर थांबा अगोदर हे वाचा!
Turmeric | बहुगुणकारी ‘कच्ची हळद’, शरीराला ‘या’ गंभीर आजारांपासून ठेवले दूर!https://t.co/Lxb4VlMkMk#HealthBenefits #RawTurmeric
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 22, 2020
(Grapes oil is beneficial for the skin)